Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलढाणा जिल्ह्यात कोरोना वैक्सिन लावण्याच्या दिशेने वाटचाल सुरू

Responsive Ad Here

लोणार तालुका प्रतिनिधी : मो.असलम परवेज

     कोरोना लसीकरणाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने देशभर राबविण्यात येणार असून याची पूर्वतयारी म्हणून राज्य व जिल्हा पातळीवर नियोजन करण्याचे काम सुरु असताना बुलढाणा जिल्ह्याने या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे महत्त्वाची सभा घेण्यात आली. यावेळी जागतिक आरोग्य संस्थेचे प्रतिनिधी डॉक्टर सय्यद मुजम्मिल,जिल्हा शल्यचिकित्सक, उप मुख्यकार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी कांबळे, अपर पोलिस सुपरिटेंडेंट बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते व  जिल्ह्यातील  इतर अधिकारी उपस्थित होते. कोरोना लसीकरण आतापर्यंतची सर्वात मोठी मोहीम ठरणार असून याकरिता सर्वांनी तत्पर रहावे अशी सूचना प्रभारी जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे यांनी केली.

         संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार असून प्रथम टप्प्यांमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर,परिचारिका, सर्व खाजगी डॉक्टर, त्यांचे सहाय्यक यांना लसीकरण करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यामध्ये पोलिस विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच ज्यांनी कोरोना काळामध्ये फरंट लाईन वर्कर म्हणून काम केले आहे असे कर्मचारी तसेच महसूल विभागातले अधिकारी व कर्मचारी आणि नगर परिषद व इतर विभागातले कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येणार आहे. त्यानंतर चौथ्या टप्प्यामध्ये पन्नास वर्षाहून जास्त वय असणारे लोकांना हि लस दिल्या जाईल. त्यानंतर पन्नास वर्षाहून कमी वय असणारे परंतु मुख्य आजार असणाऱ्या नागरिकांना लस दिल्या जाईल. अशी माहिती जागतिक आरोग्य विभागाचे प्रतिनिधी डॉक्टर सय्यद मुजम्मिल यांनी दिली.

                   सदर लसीकरण करिता एका विशेष ए्पलिकेशनवर नोंदणी करावी लागेल. लसीकरण करिता वेटिंग रूम, प्रत्यक्ष लसीकरण रूम व ऑब्झर्वेशन रूम असे तीन वेगवेगळे टप्पे असणार असून एका वेळेत एक व्यक्तीलाच ही लस देण्यात येणार असून त्याची माहिती संबंधितांना एका मेसेज द्वारे कळविण्यात येईल. लसीकरणाच्या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच स्वच्छतेचे नियमाचे कटाक्षाने पालन करण्यात येईल. लस संपूर्णपणे सुरक्षित असणार असून नागरिकांनी याबाबत कोणताही गैरसमज पाळू नये अशी सूचना यावेळी करण्यात आली.

                    यावेळी नियोजन सभागृहामध्ये सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, आरोग्य खात्याशी संबंधित अधिकारी तसेच जिल्हा व तालुक्यातील विविध विभागाचे अधिकारी प्रमुख्याने उपस्थित होते.