Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तहसील कार्यालयात मतदार दिवस साजरा

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     एरंडोल - येथे २५ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी विनय गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली मतदार दिवस साजरा करण्यात आला.यावेळी दीपप्रज्वलन होऊन मतदारांसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.तसेच व्ही.सी.द्वारे एरंडोल विधानसभा मतदार संघातील २९० मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांना मार्गदर्शन करण्यात आले.

     राकेश आत्माराम पाटील,दिनेश शिवलाल बडगुजर,गणेश व्यंकटराव पाटील यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ठ बी.एल.ओ.चे प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच एरंडोल विधानसभा मतदार संघात उत्कृष्ट काम केल्या बद्दल किशोर महाजन,ज्ञानेश्वर पाटील,अविनाश पाटील,सुधाकर माळी,भावना बागल या बी.एल.ओ. यांना विनय गोसावी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.याप्रसंगी निवासी नायब तहसीलदार एस.पी.शिरसाठ व निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र अहिरे, महसूल नायब तहसीलदार रवींद्र जोशी,मनोहर रजिंद्रे आदी उपस्थित होते.