गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल - महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पा संबंधात ग्राम विकास विभागाने निर्गमित केलेले अन्याय कारक शासन निर्णयाचा निषेध नोंदविण्यासाठी पंचायत समिती समोर काळया फिती लावून निदर्शने करण्यात आली.तसेच शासन निर्णयाची होळी करण्यात आली.
या आंदोलनात परिचालक संघटनेचे तालुकाध्यक्ष रामचंद्र पाटील,सचिव महेंद्र पाटील,संतोष चौधरी,सोपान पवार,दिनेश पाटील,गजानन पाटील,उमेश राठोड,गजानन माळी,सचिन निकम,मनीषा धर्माधिकारी,राजश्री धर्माधिकारी,प्रीती कुलकर्णी यांचेसह तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीची संगणक परिचालक सहभागी झाले होते.
