देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
सरहद्दीवर रात्रंदिवस पहारा देत देशाचे संरक्षण करणाऱ्या जवाननांप्रती क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेलोडी गावाने पुढाकार घेत माजी सैनिकांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करुण समाजासमोर नवीन आदर्श घालून दिला आहे.
शेलोडी गावात आजी-माजी सैनिकांची संख्या लक्षणीय असुण स्वातंत्र्य दिनी तसेच प्रजासत्ताक दिनी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण व्हावे अशी तरूणांची बऱ्याच दिवसांपासून ईच्छा होती. त्यासाठी त्यांनी युवा संघाच्या मदतीने गावातील बस स्थानक चौकात एक ध्वजस्तंभ ऊभारुण तेथे गावातील कार्यरत आजी-माजी सैनिक तसेच सुरक्षा दलात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नावाचा फलक लाऊण , "आम्हाला आपला अभिमान आहे " असे स्लोगन त्यावर टाकत त्यांचा सन्मान केला आहे.
याबरोबरच २६ जानेवारी २०२१ रोजी गावातील व परिसरातील आजी-माजी सैनिकांना बोलाऊण त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निव्रुत्त सुभेदार ओंकार जाधव यांचे हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी गावकऱ्यांचा , तरूणांचा व बालगोपाळांचा ऊत्साह पाहण्याजोगा होता. यावेळी ध्वजस्तंभाभोवतीचा परिसर तीरंगी फुग्यांनी सजवुण त्याभोवती आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. यावेळी माजी सैनिक राजेंद्र नेमाने , विश्वनाथ जायगुडे , त्र्यंबक गवई , जगन्नाथ भांबळे , बापू सकुंडे , अशोक वाघमारे , शिवाजी कदम , योगेश शेवाळे , विजय धंदर , दिपक कापसे , दिपक काळे , निव्रुत्ती बळप या सैनिकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी युवा संघ शेलोडी यांनी पुढाकार घेतला.
