रामचंद्र मुंदाने अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यात येणार्या चांदूर बाजार येथील गो.सी. टोम्पे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात पाणी व माती परीक्षण प्रयोगशाळा, वनस्पतीशास्त्र विभाग, भूगर्भशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जैविक शेती जनजागृती अभियानांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मा. भास्करदादा टोम्पे तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जी. एस. गिल, कृषीतज्ञ, पंजाब, प्राचार्य डॉ. राजेंद्र रामटेके, कृषी अधिकारी श्री. अरुणराव गजभिये, श्री. अभ्युदय सोमवंशी, श्री. आशिष नवले, श्री. दिलिपराव विघाते प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कर्मयोगी संत गाडगेबाबा व संस्थापक अध्यक्ष गोविंदरावदादा टोम्पे यांच्या प्रतिमेचे पूजन करून मा. भास्करदादा टोम्पे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे शाल, स्मृतीचिन्ह व ग्रंथ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी आपल्या प्रास्ताविकपर भाषणातून डॉ. मंगेश अडगोकर,रासेयो, कार्यक्रम अधिकारी यांनी कार्यक्रम आयोजना मागची भूमिका सविस्तर विशद केली. प्रमुख वक्ते डॉ. जी. एस. गिल म्हणाले की, रासायनिक शेतीमुळे उत्पन्नात वाढ होत आहे पण मानवी आरोग्य धोक्यात येत आहे. तेव्हा सेंद्रिय शेती आपण केली पाहिजे. शास्त्रीय पद्धतीने सेंद्रिय शेती केल्यास उत्पन्न वाढेल व आरोग्यही सुरक्षित राहील. निरोगी आरोग्य हे सर्वात मोठी मानवी संपत्ती असल्याचेही मत मांडले. पुढे म्हणाले की बैल, गाय, म्हैस यांच्या मलमूत्रामध्ये गुळ व बेसन योग्य प्रमाणात मिक्स करून पिकांना ड्रीप वाटे दिल्यास पिकावर कोणतेही रोग येणार नाहीत असेही म्हणाले. अशा विविध जैविक पद्धतीचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत वापर करून कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल याचा प्रयत्न करावा . असे आव्हान केले. याप्रसंगी कृषी अधिकारी श्री. अरुणराव गजभिये यांनीही विषमुक्त शेती का करावी यावर आपले महत्वपूर्ण विचार मांडले तर श्री. राजाभाऊ देशमुख व श्री. दिलीपराव यांनी जैविक शेतीचे फायदे व निरोगी आरोग्याकरीता आणि आपण सर्वांनी दूर्धर आजारापासून स्वतःला व कुटूंबाला वाचवण्याकरीता जैविक शेतीला पर्याय नाही असे प्रतिपादन केले. शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणातून संस्थेचे सचिव मा.भास्करदादा टोम्पे यांनी शेतकरी हा सर्व जगाचा पोशिंदा असून सततच्या नापिकीमुळे तो संकटात सापडला आहे, तेव्हा शेतकऱ्यानी आपले कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे वाढवता येईल यासाठी रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय शेती करावी जेणेकरून शेतीचा खर्च कमी होऊन उत्पन्न वाढेल व विषमुक्त शेती निर्माण होईल असे म्हणाले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंगेश अडगोकर, रासेयो, कार्यक्रम अधिकारी, यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण परिमल यांनी मानले. शेतकर्यांची नोंदणी डाॅ. प्रशांत सातपूते, प्रा. ज्ञानेस्वर वारंगे, डाॅ. जयंत बन्सोड, तर मंच व्यवस्था डाॅ. निधी दिक्षीत, महीला कार्यक्रम अधिकारी, डाॅ. युगंधरा गुल्हाणे, डाॅ. प्रिया देवळे, प्रा. मजूषा पवार, डाॅ. प्रफुल्ल चौधरी, सहकार्यक्रम अधिकारी, डाॅ. उमेश कनेरकर यांनी केली, तर डाॅ. अतुल सरोदे, डाॅ.धनंजय बिजवे, डाॅ. सचिन भोम्बे, डाॅ. दुमटकर, श्री. रविकांत कोल्हे,श्री. प्रणित देशमुख, श्री. रोशन सावरकर, श्री. नितीन सातपूते, श्री. देशमुख, श्री. पवार कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरीता यांनी प्रयत्न केलेत. प्र-प्राचार्य देवतळे, प्राचार्य डाॅ. संजय शेजव,श्री राजाभाऊ देशमुख, श्री. दिलिपराव विघाते, श्री.ठाकरे या कार्यक्रमाला परिसरातील अनेक शेतकरी, महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

