रामचंद्र मुंदाने अमरावती जिल्हा प्रतिनिधी
विनायक विद्या मंदिरात प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण
अमरावती येथील छत्री तलाव परिसरा लगतच्या प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्ट संचालित विनायक विद्या मंदिर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ,विनायका गुरुकुल तथा विनायक विधी महाविद्यालय येथे भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर उपस्थितांच्या वतीने यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टच्या अध्यक्षा तथा अमरावतीच्या आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. पद्माकर टाले, विनायका गुरुकुल च्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड रेखा सुर्वे मॅडम , प्रवीण खोडके मेमोरियल ट्रस्टचे संचालक यश खोडके, सौ.सीमाताई खोडके, मुख्याध्यापिका आरती निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम आमदार महोदयांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी स्व. विनायकराव खोडके यांच्या प्रतिमेचे पूजन ,माल्यार्पण व दीप प्रज्वलन करण्यात आले ,तद नंतर आ. सुलभाताई खोडके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सर्व उपस्थितांनी सामूहिक राष्ट्रगीत सादर करून भारतीय तिरंग्याला मानवंदना दिली .
जगातील सर्व लोकशाही देशांमध्ये राज्यकारभार करण्यासाठी राज्यघटना असते त्यामध्ये कायदेमंडळ मंत्रिमंडळ ,न्याय मंडळ व प्रशासन कसे असावे तसेच राज्याचा उद्देश काय असावा हे सांगितले असते ,याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आम्ही भारताचे लोक या भारताचे संविधान उद्देशिकेचे यावेळी उपस्थितांच्या वतीने सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालयीन वूमेन सेलच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांचा यावेळी आमदार सुलभाताई खोडके यांच्या हस्ते पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला .कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिनी ,प्राध्यापक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व आमंत्रित सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. प्रजासत्ताक व्यवस्था निर्माण करतांना जनता हीच सार्वभौम राहील ,म्हणून देशात स्वातंत्र्य, समता, बंधुत्व नंदाण्यासाठी सर्वानी लोकशाहीचा स्वीकार करून प्रत्येक नागरिकांच्या न्याय-अधिकाराचे रक्षण करण्याचे आवाहन आ. सुलभाताई खोडके यांनी केले. या प्रसंगी आमदार सुलभाताई खोडके यांनी सर्व उपस्थितांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
