रामचंद्र मंदाने अमरावती जिल्हा प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून शाळेत प्रवेश
27 जानेवारी 2021 पासून 5 ते 7 व्या वर्गा पर्यंतच्या शाळा राज्यांसह तिवसा तालुक्यात सुद्धा सर्व अटींसह सुरू करण्यात आल्या असून काही शाळेत रांगोळ्या टाकून तर काही शाळेत विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून तर काही शाळेत विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन शाळेत प्रवेश देण्यात आले . यावेळी तिवसा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी प्रवेशद्वारावर सजावट करून . विद्यार्थ्यांच्या हस्ते फीत कापून व गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला .
शाळेच्या पहिल्याच दिवशी 80 टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती दाखविली होती . यावेळी शिक्षकांनी सुद्धा मुलांच्या आरोग्याची काळजी घेत सोशल डिस्टंसिंग सह शॅनि टायझर मास्क व इतर नियमांचे पालन करून मुलांचे शाळेत स्वागत केले . कोरोणा महामारी च्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यापासून शाळा बंद होत्या .आता कोरोणा रुग्णांच्या संख्येत घट येत असल्याने हळू हळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू होत आहेत . तिवसा तालुक्यात पहिल्या दिवशी विद्यार्थी व पालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत होता . तिवसा जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांबरोबरच पालकांचे सुद्धा गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .
गेल्या दहा महिन्यापासून विद्यार्थी घरीच असल्याने आता शाळा सुरू झाल्याबरोबर विद्यार्थ्यांमध्ये उत्साह व चैतन्य दिसत होते . पालकात सुद्धा आनंदाचे वातावरण दिसत होते . राज्य शासनाने टप्प्या-टप्प्याने शाळा सुरू केल्या असून सुरुवातीला नववी ते बारावी व आता पाचवी ते आठवी वर्गापर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत .कोरोणा महामारी चे सर्व नियम व अटी पाळून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत . तालुक्यातील सर्व शाळेत शाळा सुरू होण्यापूर्वी काळजी म्हणून . सर्व वर्गखोल्या व शाळेच्या परिसरात जंतुनाशक फवारण्या करण्यात आले आहेत . प्रत्येक शिक्षकांची कोरोणा टेस्ट करण्यात आली असून . विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यापूर्वी पालकांचे संमतीपत्र घेण्यात आले . यावेळी तिवसा जिल्हा परिषद शाळेमध्ये तिवसा पंचायत समिती सभापती शिल्पा रवींद्र हांडे , यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिक्षकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले . याप्रसंगी शाळा केंद्रप्रमुख दलविर व्यास , मुख्याध्यापिका हर्षा बांबल , पुष्पा पाटणे , छाया देशमुख , कृष्णा चिंचमलकर , चंद्रकांत मनोहर , श्रीकृष्ण कोंडाणे , मंदा घुसकर , संध्या पाटील आदि शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते .
