गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत करण्यात आली. यात अनेक तरुण सहभागी होते त्यानंतर विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेता .एरंडोल बस स्थानकावर मैत्री सेवा फाउंडेशन तर्फे पेपर वाचनालय सुरू करण्यात आले त्याचे उद्घाटन एरंडोल पोलीस स्टेशनचे एपीआय तुषार देवरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.त्या प्रसंगी एरंडोल आग्रहाचे व्यवस्थापक व प्रमुख श्री वा ना पाटील व श्री बागुल साहेब सोबतच सुशील जयस्वाल व संदीप बोडरे आदी उपस्थित होते.
यानंतर कार्यक्रम हिमालय मंगल कार्यालय येथे संपन्न झाला लॉक डाउन काळात गरीब विद्यार्थ्यांची झालेली दुरावस्था लक्षात घेता सामाजिक जाण ठेवत गावातील गरजू ५० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी स्थानी एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणरावजी पाटील हे होते.
या प्रसंगी मा राजू बाबा चौधरी एपीआय देवरे साहेब मा शालीग्राम गायकवाड,विशालभाऊ तिवारी आनंदा चौधरी,जगदीश ठाकुर,संजय महाजन,चिंतामण पाटील पत्रकार संजय चौधरी मुख्याध्यापिका रोहिणी मानधने शिक्षक दिनेश चव्हाण आदी उपस्थित होते .सामाजिक कार्यकर्ते आनंदभाऊ दाभाडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले. व सूत्रसंचालन किशोर मोरांकर यांनी केले सर्वांनी मनोगतातून फाउंडेशनच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

