शहर प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल :- शहरात जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथाचे लेखन कर्ते व तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने शहरात विविध भागात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
नगरपालिका सभागृहात लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अभिजीत पाटील, मुख्याधिकारी किरण देशमुख, माजी उपनगराध्यक्ष बबलू चौधरी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, दि श पाटील महाविद्यालयाचे अध्यक्ष
अमित पाटील, जहिरोद्दीन शेख कासम, योगेश महाजन, एरंडोल तालुका तेली समाजाचे सचिव आनंदा चौधरी(भगत) सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, युवा सेनेचे शहर प्रमुख अतुल महाजन, माजी नगरसेवक सुनील चौधरी,दशरथ चौधरी,आर.डी चौधरी यांचेसह नगरपालिकेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तेली समाज पंच मंडळातर्फे संताजी चौक येथे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी तेली समाज अध्यक्ष गुलाब चौधरी, सचिव भास्कर चौधरी, आनंदा चौधरी भगत, चंद्रकांत चौधरी,कौतिक चौधरी, रवींद्र चौधरी, कैलास चौधरी असंख्य समाजबांधव यावेळी उपस्थित होते.
