Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्लस पोलिओ रविवार स्थगित

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  11जाने.

    औरंगाबाद मनपा,  दिनांक 17 जानेवारी रोजी आयोजित प्लस पोलिओ लसीकरण मोहिमेस केंद्र सरकारच्या निर्देशानुसार स्थगती देण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, लसीकरण विभागातर्फे दि 09 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या एका पत्रात पोलिओ लसीकरण मोहीम पुढच्या आदेशपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे, असे आदेश दिले आहे. 

    सदरील सूचना देशातील सर्व राज्यांचे आरोग्य व कुटुंब खात्यांचे प्रधान सचिवांना पत्रमार्फत देण्यात आली आहे. सदरील आदेशाप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत नियोजित प्लस पोलिओ लसीकरण मोहीम (पोलिओ रविवार) या मोहिमेस पुढच्या आदेशपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी सांगितल्या. पोलिओ रविवारची  तयारी औरंगाबाद महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती.