Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

प्रचार संपला.आता चेंडू मतदारांच्या कोर्टात!

Responsive Ad Here

 हिवरखेड:-जितेश कारीया

      15 तारखेला होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी 13 तारखेला संध्याकाळी प्रचारतोफा थंडावल्या. तत्पूर्वी अनेक पॅनेल आणि गटातटांनी मोठमोठ्या रॅली पदयात्रा काढून आपापले शक्तीप्रदर्शने केलीत. अपक्षांनीही आपण सुद्धा तगडी लढत देऊ शकतो हे प्रचारातून दाखवून दिले.  सर्व उमेदवारांचे मनोगत ऐकल्यानंतर आता मात्र चेंडू   मतदारांच्या कोर्टात असून 15 तारखेला मतदार राजा निर्णायक भूमिका बजावणार आहे. मात्र मतदार हा स्वतः राजा असून त्याला "सेवक निवडायचा आहे, मालक नाही" आणि 5 वर्षे आपली सेवा करणारे जनसेवक निवडायचे असून आपल्यावर राज्य करणारे राजे निवडायचे नाहीत ही बाब मतदान करताना मतदारांना लक्षात ठेवावी लागणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून ग्रामीण भागाचा बराच विकास झाला.

     पण पाहिजे त्या प्रमाणात मुळीच झाला नाही. त्यामुळे आता निवडणुकीत उभ्या असलेल्या किती जणांना गावाच्या सर्वांगीण विकासाची तळमळ आहे आणि किती जणांना फक्त स्वतःच्या विकासाची तळमळ आहे हे ओळखणे कोणालाही शक्य नाही. त्यामुळे पूर्णपणे विचार करून आतापर्यंतचे चांगले आणि कटू अनुभव डोळ्यासमोर ठेवूनच यावेळी मतदार राजा मतदान करणार आहे.  मतदान करण्यापूर्वी अनेक प्रश्न मतदारांच्या मनात उफाळून येत आहेत. त्यांची उत्तरे त्यांनी स्वतःलाच विचारने आवश्यक असून त्यामध्ये प्रामुख्याने

File Photo

खोटी आश्वासने देणारे असावे की आश्वासनांची पूर्तता करणारे असावे?

आलेला निधीने गावाचा विकास करणारे पाहिजेत की निधी हडपून स्वतःचा विकास करणारे पाहिजेत?

जनतेसोबत हुज्जतीने वागणारे पाहिजे की विनम्रतेने वागणारे पाहिजे?

सरपंच पदासाठी वाटाघाटी करणारे पाहिजे की सरपंचपद 5 वर्ष टिकविणारे पाहिजेत?

जनतेसोबत दादागिरी करणारे पाहिजे की सन्मानाने वागणूक देणारे पाहिजे?

नागरिकांवर दबावतंत्राचा वापर करणारे पाहिजे की विकासात्मक भूमिका असणारे पाहिजे?

 कागदोपत्री काल्पनिक ग्रामसभा घेणारे पाहिजेत की ग्रामसभेद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेणारे पाहिजेत?

गावाची वाट लावणारे पाहिजे की विकासाची वाट दाखविणारे पाहिजे? 

दारू पाजून मते विकत घेणारे पाहिजेत की गावाला विकण्यापासून वाचविणारे पाहिजे? 

असे अनेक प्रश्न जनतेच्या मनाला भेडसावत असून योग्य उमेदवार निवडण्यासाठी जनतेने स्वतःला हेच प्रश्न विचारल्यास अंतिम निर्णय घेणे सोपे राहील. त्यामुळे हे सर्वस्वी जनता जनार्धनालाच ठरवावे लागणार आहे. आणि जागरूक जनता आता निर्णायक भूमिका बजावणारच असे संकेत दिसत आहेत.