Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल तालुक्यात कोरोणा लशीची रंगीत तालीम.

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

     प्रतिनिधी - एरंडोल तालुक्यातील तळई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोणाच्या पार्श्भूमीवर लसीकरणाची रंगीत तालीम करण्यात आली.राज्यात लवकरच लसीकरण करण्यात येणार असुन या पार्श्भूमीवर सदर प्रात्यक्षिक करण्यात आले.

    यावेळी ५५ कर्मचाऱ्यांना कोरोना लस टोचणे प्रात्यक्षिक देण्यात आले.याप्रसंगी एरंडोल तालुका आरोग्याधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी प्रत्यक्ष लसीकरण करतांना येणाऱ्या अडचणी बद्दल मार्गदर्शन केले.दरम्यान यावेळी प्रत्यक्षात लसीकरण मांडणी करण्यात आली होती.

    त्यांचे तीन खोल्यांमध्ये वर्गीकरण करण्यात आले होते.पहिल्या खोलीत आलेल्या व्यक्तींची नोंदणी करुन प्रतिक्षालय असणार आहे.दुसऱ्या खोलीत प्रत्यक्ष लस टोचली  जाणार आहे तर तिसऱ्या खोलीत लस टोचल्या नंतर त्या व्यक्तींचे अर्धातास निरीक्षण केले जाणार असल्याचे डॉ.फिरोज शेख यांनी सांगितले.याप्रसंगी यावेळी डॉ.वानखेडे,डॉ.मराठे,डॉ.निशांत शेख,डॉ.शिंदे,तालुका आरोग्य सहाय्यक राठोड,पंचायत समिती आरोग्य सेवक केशव ठाकुर तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.