Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यात शिवसेनेची जोरदार मुसंडी

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

     70 ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे 21 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले.गेल्या तीस वर्षापासून भाजपाची एक हाती सत्ता असलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने यावेळेस ग्रामपंचायतीमध्ये जोरदार मुसंडी मारली असून शिवसेनेने आपला झंझावात कायम ठेवला आहे. जामनेर तालुक्यातील 72 ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या निवडणुकीत नुकताच आज झालेल्या निकालांमध्ये जामनेर विधानसभा मतदारसंघात महा विकास आघाडी तसेच काही ठिकाणी अपक्ष म्हणून शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार प्रथमच ग्रामपंचायत मध्ये दाखल झाले असून 15 ते 20 ठिकाणी ग्रामपंचायत शिवसेनेचा झंझावात फडकणार आहे जामनेर तालुक्यातील बऱ्याच महत्त्वाच्या गावांमध्ये या ग्रामपंचायत निकालांमध्ये शिवसेनेचे शिलेदार निवडून आले आहेत.

       शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत राजे पाटील एडवोकेट भरत पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील शिवसेना प्रसिद्धीप्रमुख गणेश पांढरे आदी पदाधिकाऱ्यांनी जामनेर विधानसभा मतदारसंघात आपला झंझावात कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केल्याने आज गेल्या तीस वर्षापासून शिवसेनेला दिसणाऱ्या विरोधकांना एक प्रकारच्या चपराक  मिळाले असून येणारा जिल्हा परिषद व पंचायत समितीत सुद्धा शिवसेना चा भगवा फडकला अशा आशावाद शिवसैनिकांमध्ये निर्माण झाला आहे