मो.असलम परवेज; लोणार तालुका प्रतिनिधी
२७ जानेवारी २०२१ पासून राज्यातील इयत्ता ५वी व ८ वी चे वर्ग सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले आहे. या निर्णयाचा शिक्षकांनी व शिक्षकांच्या विविध संघटनांनी स्वागत केले आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याची तयारी युद्धपातळीवर शिक्षक करीत आहे. इयत्ता ५वी व ८वी ला शिकविणाऱ्या शिक्षकांची कोविड चाचणी करण्याचे निर्देश प्राप्त होताच दिनांक २१ जानेवारी २०२१ गुरुवारला लोणार येथील गट शिक्षण अधिकाऱ्यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी समन्वयक साधून शिक्षकांचे rt-pcr टेस्ट करण्याचे नियोजन केले असता याला शिक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शासन परिपत्रकान्वये इयत्ता ९ वी ते १२ वी चे वर्ग दि. २३ नोव्हेंबर, २०२० पासून सुरु करण्यात आले आहेत. राज्यातील शाळांमध्ये इयत्ता ९ पी ते १२ वी चे वर्ग सुरक्षितपणे सुरु असून टण्या- टप्याने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विध्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. राज्यातील कोविड बाधित रूग्णांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्रणाखाली असल्यामुळे शाळांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व त्याचा मानसिक परिणाम विद्यार्थी व पालकांवर होऊ नये या धारणेतून शाळा सुरू करण्यात येत आहे. राज्यातील शाळा सुरू करण्यास सार्वजनिक आरोग्य विभाग सहमत असल्याने राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते इयत्ता ८ वी चे वर्ग दिनांक २७ जानेवारी, २०२१पासून सुरू करण्यास मान्यतादेण्यात आली आहे.
कोविड-१९ बाबत केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे. तसेच दि.१५ जुन, २०२०, दि. २९ ऑक्टोबर,२०२० व दि. १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या परिपत्रकातील गार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे व वर्ग सुरक्षितपणे सुरु होतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश संबंधित जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकाना देण्यात आले आहे.
