Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

Responsive Ad Here

प्रदीप रघुते अमरावती प्रतिनिधी

        मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी अशी मागणी पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने महाराष्ट्र शासनाकडे करून त्याचा सतत पाठपुरावा केला त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ही मागणी मंजूर करून थोर पुरुषांच्या जयंती साजरी करण्याच्या शासकीय परिपत्रक मध्ये याचा समावेश केला आणि सर्व शासकीय तथा निमशासकीय कार्यालयांमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्याचे आदेश दिले.

    त्यामुळे पॉवर ऑफ मीडिया या पत्रकारांच्या संघटनेने अमरावतीच्या इरविन चौकात शासनाच्या या घोषणेचा फटाके फोडून मोठ्या प्रमाणात जल्लोष केला आणि महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानले तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या फोटोंचे पूजन ज्येष्ठ पत्रकार शिवराय कुलकर्णी आणि पत्रकार हल्ला निवारण समितीचे अध्यक्ष प्रवीण हरणकर यांचे हस्ते करून त्यांची जयंती साजरी केली तसेच जांभेकर यांना उपस्थित असंख्य पत्रकारांनी आदरांजली वाहिली या कार्यक्रमाच्या पूर्वी अमरावतीचे ज्येष्ठ पत्रकार शिवराय कुलकर्णी,पत्रकार हल्ला निवारण समितीचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण हरमकर,पॉवर ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष उमेश लोटे, अम्. महानगराध्यक्ष सुधीर गणवीर यांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून पूजन करण्यात आले.

    या कार्यक्रमामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात यावी याकरिता शासनाकडे सतत पाठपुरावा करून ही मागणी मंजूर करऊन घेणारे पॉवर ऑफ मिडियाचे अमरावती विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राम्हणवाडे यांचा सत्कार शिवराय कुलकर्णी आणि प्रवीण हरमकार यांचे हस्ते करण्यात आला.

    या कार्यक्रमाला पॉवर ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे विदर्भ प्रदेश सदस्य अमोल नानोटकर, डॉ.कुशल लोटे,राजेंद्र ठाकरे,प्रवीण शेगोकार,प्रसिद्धी प्रमुख फणिंद्र वाडकर,वकील दानिश,राजेश राजपूत, सतीश वानखेडे, पवन श्रीवास्तवं,योगेश श्रीवास्तव, बी. एन.देशमुख,गजानन जिरापुरे,वैभव गव्हाणे, ऋषिराज आठवले, विक्की बाभुळकर, अनिताताई बाजड,मीनाक्षी कुरवाडे ,लताताई अंबुलकर, पुष्पा जैन,रुची बंगाय्या,मुस्कान श्रीवास्तव,कोमल इंगळे,निकिता राऊत,हर्षा अडलोक,लक्ष्मी वाघमारे यांचेसह असंख्य पत्रकार मंडळी उपस्थित होती.