Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा वरोरा तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी

Responsive Ad Here

वरोरा प्रतिनिधी

       19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभाविप वरोरा शाखेतर्फे छत्रपती  शिवाजी महाराज स्मारक येथे  शिवाजी महाराज  यांच्या मूर्ती चे सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते  दुधाने राज्याभिषेक  करण्यात आले.  व  त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून  माल्यार्पण करण्यात आले.  व जल्लोष मध्ये 'भारत माता की जय'  'शिवाजी महाराज की जय ' 'जय जिजाऊ जय शिवराय' असे  वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या व सर्व कार्यकर्त्यांनी मूर्ती चे राज्याभिषेक करून  मुर्ती व प्रतिमेला फुल अर्पण करून आशीर्वाद घेतला.

     व मिठाईचे वाटप केले व कोरोना विषाणू चा वाढता प्रकोप लक्षात घेता मास्क व  सॅनिटायजर चा वापर करून सोशल  डिस्टसिंग चे पालन करून अशा प्रकारे अभाविप वरोरा शाखेतर्फे  शिवजयंती साजरी करण्यात आली. या अभाविप जिल्हा समिती सदस्य शकिल शेख, गणेश नक्षीणे, कुणाल घुमे, नगर मंत्री तृप्ती गिरसावळे,  महाविद्यालय प्रमुख लोकेश रुयारकर, विद्यार्थ्यींनी प्रमुख पूजा येरगुडे,  निधी राखुंडे, छकुली गेडाम, छकुली पोटे, स्वाती हनुमंनते ,करणं चिकटे, आदित्य गारगाटे, आदी अभाविप कार्यकते व शिवभक्त व असंख्य नागरिक उपस्थित होते.