Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

Responsive Ad Here

प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव  

   औरंगाबाद-  कोविड-19 विषाणु प्रतिबंधात्मक लस पूर्णत: सुरक्षित असून कोरोना आजारापासून स्वत:बरोबरच इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने ही लस टोचून घ्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी स्वत: लस टोचून घेतल्यानंतर केले. 

    चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सामान्य नागरिकांप्रमाणे नोंदणी करुन कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कमलाकर मुदखेडकर, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या नोडल अधिकारी 

    डॉ.विजया सोनवणे व इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.  लस टोचून घेतल्यानंतर श्री.केंद्रेकर म्हणाले की, कोरोना प्रतिबंधात्मक लस सुरक्षित असल्याने मी स्वत: लस टोचून घेतली आहे. ही लस टोचून घेणे हे आपल्या सर्वांच्याच हिताचे आहे असे विभागीय आयुक्त म्हणाले.