देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी
चिखली मतदारसंघातील बहुतांश गावांमध्ये जिथे प्यायच्या पाण्याची सोय नव्हती तिथे हजारो शेतकरी बांधव धरणाच्या पाण्याने आज शेती मधून खूप चांगल्या प्रकारचे उत्पन्न घेत आहेत .ज्या गावांमध्ये लोक लग्नासाठी मुली देत नव्हते त्या गावांचे चित्र आज भारत भाऊंच्या माध्यमातून झालेल्या धरनांमुळे पूर्णपणे बदलले आहे यात शंका नाही.
आज या भागातील हजारो शेतकरी पाटाच्या पाण्याने भाजीपाला, सोयाबीन, हरबरा, गहू याचे भरघोस उत्पन्न घेत आहे .उन्हाळी भुईमूग तसेच ऊस,द्राक्ष, कांदा, हळद ,मिरची,अद्रक, पपई व पेरू यासारखे बागायती शेती करून आपले राहणीमान चांगले करीत आहेत. शेतकरी सधन होत असल्यामुळे चिखली परिसरातील व शहरातील व्यापारामध्ये पण खूप मोठा बदल पाहायला मिळत आहे. आज चिखली बाजारपेठ हे जिल्ह्यांमधील एक अग्रगण्य मार्केट म्हणून ओळखले जाते .
शेतकऱ्यांना होत असलेला लाभ ,त्यांचा मनस्व आनंद,लोक दैनंदिन स्वरूपात अनुभवत आहोत. सिंचन क्षेत्राचा योग्य लाभ घेऊन आपले जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला हा आनंद असा व्यक्त केला.राज्याचे जलसंपदा मंत्री ना .जयंतराव पाटील भारत भाऊंना भेटावयास आले असताना,या शेतकऱ्यांनी त्यांचेही आभार मानले.विशेष म्हणजे या भागातील शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मा. भारतभाऊ व मा. ना. शिंगणे साहेब यांच्या माध्यमातून शंतनू भाऊ बोंद्रे यांनी लावून धरले म्हणून व भारत भाऊंचा मुलगा म्हणून सर्व शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचा हाराने त्यांच्या जो हृदयातून सत्कार केला हा सत्कार कायम मनावर कोरलेला राहील. शंतनू भाऊ सारख्या सामान्य कार्यकर्त्याचा हा आगळा - वेगळा सत्कार नेहमी त्यांच्या व लोकांच्या सदैव लोकसेवेचि प्रेरणा देत राहीन.
