Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथील जवान राहूल पाटील पंजाब पाकिस्तान सिमेवर शहीद

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी 

     आठवडाभरापूर्वी चाळीसगावचा जवान शहीद झाल्याची घटना ताजी असताना एरंडोलच्या जवानाला वीर मरण आल्याची घटना हृदय हेलावणारी घटना घडली आहे . येथील शंकरनगर (गांधीपूरा) परिसरातील रहिवासी राहूल लहू पाटील ( वय ३० वर्षे ) हा जवान पंजाब पाकिस्तान सिमेवर कर्तव्य बजावत असताना शहिद झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली . पंजाब मधील फजलखां येथे जवानांसाठी असलेल्या निवासस्थानां मध्ये पाटील यांच्या परिवार वास्तव्यास होते . तेथून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर भारत पाकिस्तानच्या सीमेवर राहुल पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांना वीर मरण आले .

      घटनेमुळे एरंडोल शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . विशेष हे की 4 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांनी आपल्या मुलीचा वाढदिवस घरगुती वातावरणात साजरा केला होता व त्यांनी 5 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी साडेसात च्या सुमारास व्हिडिओ कॉल करून एरंडोल येथील त्यांच्या भावाशी आई शी बोलताना सांगितले की पुढच्या महिन्यात मी माझ्या परिवारासह घरी येणार आहे . यावेळी पाटील यांनी व्हिडिओ वरून भाऊ व आईला कर्तव्य बजावत असलेल्या स्थळाचे चित्र दाखविले .

     राहुल पाटील हे बी.ए पर्यंत शिक्षण घेतले असून त्यांचा एक भाऊ व आई एरंडोल येथे पाण्याच्या टाकी जवळ वास्तव्यास आहे ते 2009 मध्ये लातूर येथे लष्करात भरती झाले होते. ते बी एस एफ मध्ये सेवेस होते त्यांना दोन मुली असून पत्नी व त्यांच्या दोन मुलींसह ते पंजाब मध्ये राहत होते शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास एरंडोल ला त्यांच्या भावाला फोन वरून त्यांचे वीर मरण  झाल्याचे माहिती देण्यात आली .