Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बालगृहात मिष्ठान्न भोजन आणि शैक्षणिक साहित्य वाटप

Responsive Ad Here

गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

       कै.यशवंत बळीराम पाटील शिक्षण प्रसारक मंडळ  संचलीत अनाथ मुला मुलींचे बालगृह खडके बु .येथे तळई  येथिल सामाजिक कार्यकर्ते श्री.समाधान बाजीराव पाटील (बाबा) माजी उप सरपंच यांनी सासूबाई  कै. सुशीलाबाई चिंतामण पवार यांच्या स्मरणार्थ आप्तेष्ठ व मित्र परिवारासह येवून अनाथ ,निराधार,निराश्रीत मुलांना आणि मुलींना मिष्टान्न भोजन दिले. सौ.प्रिती सी.पवार ;सौ.सुधा जाधव;माधुरी पवार;अमृता पवार या आजींच्या चार मुली असुन त्या 


उच्चशिक्षित असुन चांगल्या पदावर कार्यरत आहेत परंतु आई वडील गेल्यावर जे दुख अनुभवत आहेत त्या भावना या मुलांसोबत व्यक्त केल्या  आणि आईने आम्हाला शिकवले व संस्कारक्षम बनविले त्यामुळे आम्ही आज चारही बहीणी स्वतःच्या पायावर उभे आहोत .तसेच प्रयत्न करुन जिद्दीने अभ्यास करून नाव कमवावे असा मोलाचा सल्ला दिला आणि सर्व बालकांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. आई वडीलांचे छत्र हरवलेल्या बालकांना मायेने व प्रेमाने वागवून संस्कारक्षम बनवत असल्यामुळे  आम्ही भाराऊन गेलो अशा भावना व्यक्त केल्या. व संस्थेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.      या कार्यक्रमाप्रसंगी बालगृह अधिक्षक मधुकर कपाटे यांनी या परिवाराचे आणि उपस्थितांचे आभार मानले संस्थेतील बालकांसाठी मोलाची मदत केल्यामुळे संस्थाचालक दादासो.प्रभाकर पाटील यांनी  श्री.समाधान बाजीराव पाटील आणि पवार परिवार यांचे आभार मानले.सदर कार्यक्रमासाठी सर्वोदय माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक ;उपशिक्षक ;शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधिक्षक मधुकर कपाटे ,प्रमोद पाटील ,तुषार अहिरे,गणेश पंडीत ,ऋषीकेश ठाकरे,सौ.अरूणा पंडीत,  यांनी परिश्रम घेतले.