प्रतिनिधी औरंगाबाद @ दत्ता जाधव
औरंगाबाद - सदरची घटना पिसदेवी येथील रुक्मिणी अपार्टमेंट येथे घडली असून पती सिद्धेश त्रिवेदी यांनी पत्नी कविता त्रिवेदी वय 32 यांच्यासोबत वादानंतर किचनमध्ये डोक्यावर रोडचा वार करून खून केलेला आहे.
पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तसेच दोन चिमुकल्याला घरामध्ये कोंडून सिद्धेश त्रिवेदी हा फरार झालेला आहे. सिद्धेश त्रिवेदी हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपिक या पदावर कार्यरत आहे. मंगळवारी दिवसभर दोन्ही चिमुकले आई आईच्या मृत देहा जवळ बसून रडत होती सायंकाळी मुलं दरवाजा जवळ येऊन रडत दरवाजा हलवत होती शेजार्यांनी कुलूप तोडून पाहिलं
मुलांची आई रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत पाहिलं लगेच चिकलठाणा पोलिसांना कळवले उपवभिगीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहूल, सहाय्यक पोलीस नि. विश्वास पाटील, हवालदार रवींद्र साळवे यांच्या सह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले घटनेची माहिती घेत फॉरेनसिक लॅब, ठसा तज्ज्ञ पथकास पाचरण केले त्या नंतर मृतदेह घाटी रुग्णालय येथे पाठवला.आरोपीच्या मुलानी पोलिसांना सांगितले कि पप्पा नी आम्हाला भांडणा दरम्यान ढकले.आरोपीच्या शोधा साठी पथक रवाना झाले आहे.
