Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील यांना पुण्यस्मरणानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने विनम्र आदरांजली

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

       राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील (आबा) यांच्या पुण्यस्मरणा दिना निमित्त नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत मोखड  येथे भेट दिली. स्वर्गीय आर आर पाटील यांच्या नावाने शासनाने सुरू केलेल्या स्वच्छ ग्राम व समृद्ध गाव स्पर्धेमध्ये तालुक्यातून प्रथम क्रमांक "मोखड" गावाला मिळाला आहे. जिल्हास्तरिय  बक्षिसाचा करिता अधिकाऱ्यांची टीम भेट देऊन गेली.

       गावामध्ये शुद्ध आरोचे पाण्याचे एटीएम, सुसज्ज ग्रामपंचायत  इमारत, गावाच्या दुतर्फी असलेली झाडे हे गावा त्याच्या सौंदर्यामध्ये अधिक भर टाकणारे आहे. विविध जाती धर्माची लोक राहत असलेल्या या गावांमध्ये गावाच्या विकासाकरिता लोक गुण्यागोविंदाने एकत्र येतात आनंदाची बाब या ठिकाणी दिसून आली. स्वर्गीय आर आर आबा यांचे पुण्यस्मरण आज या गावाला भेट देऊन आर आर आबांच्या खऱ्या अर्थाने विनम्र आदरांजली अर्पण केली! या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. सुशील गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल सानप, मनोज गावंडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजेश भोयर, अतुल इलमे सह  तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी  उपस्थित होते.