Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वनमंत्री संजय राठोड यांना मजुर वर्गाचे नांदगावातुन प्रेमपत्र

Responsive Ad Here

प्रदिप रघुते येनस

    नांदगाव ख़डेश्वर तालुक्यामध्ये ग्रामिण व शहरी भागात पाऊस कमी होण्याचे मुख्य कारण बेसुमार वूक्षतोड हे शासनाच्या लक्षात आल्याने मागिल वर्षी राज्यभर मोठा गाजावाजा व जनजागृती करुण 1 जुलैला राज्यात एक कोटी वुक्ष लागवडीची घोषणा केली .या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील ग्रामिण भागापासुन तर शहरीभागात रोपे लावण्याचे उदिष्ट्ये दिले होते.

      वनविभाग,व सामाजिक सेवाअभावी संस्था ,शाडा,ग्राम पचांयत ही व काही व्यक्तिगत पातडीवरील लोकांनी या उपक्रमात सहभाग घेवुण जिल्ह्यातील तहसिल नांदगाव खंडेश्वर नजिक असलेल्या येनस ग्रांम पचांयत अतंर्गत मनरेगा अतंर्गत येनस ते कानस ह्या रस्तेच्या कडेला तसेच येनस ते कझंरा या रस्तेच्या कडेला दोन हजार रोपे लावण्यात आली,असे येनस ग्राॅम पचांयत मध्ये रोजगार हमी योजनेचा 4 व सात नबंर फार्म भरुण दोन्ही ही साईडवर एकुण 10 मजुरांना रोजगार मिडत आहे.परंतु कामावर असलेल्या मजुरांचे हजेरी मस्टर हे दर हप्त्याला रोजगार सेवकाच्या माध्यमातुन वनविभाग आॅफिस मध्ये जातो.

   आज 2 महिण्याचा कालावधी होऊन सुद्धा त्यांचे मस्टर नुसार येणारे पैशे हे शासनाकडुण जमाच न झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेड आलेली आहे,तेव्हा मनरेगा अतंर्गत येनस या गावातील तसेच परिसरासतील मजुर वर्गाचे 238 रुपये प्रमाणे, कामाचे दाम तातडीने देण्यात यावे त्यांना आपले जिवन जगणे सुकर व्हावे यासाठी येनस गावातील मजुरांनी वनमंत्री संजय राठोड यांना तक्रारीच्या माध्यमांतुण प्रेम पत्र पाठविले आहे.त्या मध्ये असेही नमुद केले 15 दिवसा आत आमचे पैशे जमा न झाल्यास आम्ही उपोषनाला बसणार असल्याचे मत राजकुमार मोहड,रवी समरीत,नरेश चरडे,विलास गौरखेडे यांनी व्यक्त केले.