Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

विनायक विज्ञान महाविद्यालयात सरोजिनी नायडू यांची १४२ वी जयंती साजरी

Responsive Ad Here

प्रदिप रघुते अमरावती

              नांदगाव खंडेश्वर: विनायक विज्ञान महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर येथे इंग्रजी विभागातर्फे सरोजनी नायडू यांची एकशे बेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर अलका भिसे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्राणीशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रतिभा महल्ले होत्या. कार्यक्रमाचे आयोजक वक्ते इंग्रजी विभागाचे सहा. प्राध्यापक राजीव तायडे होते. वक्त्यांनी सरोजिनी नायडू यांचे जीवनातील सुरवातीचा काळ, त्याची पारिवारिक पार्श्व भूमी ,स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचे योगदान, राजनैतिक जीवन, साहित्यातील कामगिरी, इत्यादी विषयांवर माहिती विशद केली. त्यानंतर त्यांनी सरोजिनी नायडू यांच्या प्रदर्शित पुस्तकाबद्दल माहिती दिली. 

   डॉ अलका भिसे यांनी सरोजिनी नायडू यांच्या परिवराबाबत महिती दिली. त्यांचे बंधू विरेंद्र नाथ चट्टोपाध्याय यांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान दुसरे बंधू हितेंद्र नाथ चट्टोपाध्याय जे कवी व अभिनेता होते, त्यांच्या विषयी विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण माहिती दिली तसेच त्यांचे पती पैदिपती गोविंदराजूलू नायडू व सरोजिनी नायडू यांच्या प्रेमविवाहाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कविता काकडे यांनी केले.तर आभरप्रदर्शन सहा. प्रा. सुबोध बनसोड यांनी केले. त्यासोबच विद्यार्थ्यांकरिता सरोजिनी नायडू यांच्या जीवनावर आधारित प्रशमंजुषा ऑनलाईन च्या माध्यमातून घेण्यात आली. ऑनलाईन परीक्षेमधये श्रेया ढोके साक्षी गुल्हाने साक्षी ढवळे यांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त केला.