Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

बुलडाणा जिल्ह्याचे लॉकडाऊन टळले पण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होणार- जिल्हाधिकारी श्री राममूर्ती यांची माहिती

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: लोणार तालुका प्रतिनिधी

     बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात,  कोविड आढावा बैठक संपन्न झाली असून अकोला जिल्ह्याप्रमाणे बुलडाण्यात तूर्तास कडक लॉकडाऊन  करणार नसल्याचे जिल्हाधिकारी राममूर्ती यांनी सांगितले आहे. अर्थात मास्क घालणे, सोशल डिस्टनसिंग आणि वेळोवेळी हात धुणे या त्रिसूत्रीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जातेय की नाही, हे तपासून जे याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करू, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस कमालीची वाढ होत आहे. मागील आठवड्याची सरासरी १० टक्क्यांच्या वर आहे. सर्वांसाठी ही चिंतेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा नियोजन सभागृहात कोविड आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सर्व विभागप्रमुख तथा जिल्हा आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. 

     लग्न समारंभात उसळणारी गर्दी तसेच लोकांचा रस्त्यावर अनावश्यक संचार चिंताजनक असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यापुढे तहसीलदार, एसडीओ, मुख्याधिकारी तसेच महसूल यंत्रणा या  बाबींकडे कटाक्षाने लक्ष देईल. तूर्तास शाळा महाविद्यालय बंद करण्याची गरज नाही परंतु सोशल डिस्टनसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. मास्क घालणे बंधनकारक आहे. अनावश्यक गर्दी करू नये. नियम न पाळणाऱ्यास दंड ठोठावला जाईल, असेही जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितले. 

       अकोला जिल्हाधिकारी यांनी काल, १५ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. अकोला येथे शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्यात आले असून तेथे मिरवणूक तसेच उत्सवांवर बंदी घालण्यात आली आहे. अमरावती येथेही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बुलडाण्यात सध्या लॉकडाऊन टळला असला तरी कोरोना रुग्णांची वाढती संख्या जिल्ह्याला लॉकडाऊन कडे घेऊन जात असल्याचे स्पष्ट आहे.