Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

सहाय्यक अभियंता येवला यांना आज शेतकऱ्यांचा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत निवेदन

Responsive Ad Here

नाशिक येवला प्रतिनिधी:- माधव नेहे

     तालुक्यातील शेतकरी अस्मानी संकटात असून आज वित्त कंपनी जे शेतकऱ्यांचे  कनेक्शन कट करण्याच्या मागे लागलेली आहे आणि सक्तीने राबवत असलेली  विज बिल वसुली थांबवण्यात यावी. मा. ऊर्जामंत्री नितीन जी राऊत साहेब यांनी दोन दिवसापूर्वी दिलेल्या आदेशाचे आपल्याकडून बारकाईने विचार केला असता  शेतकऱ्याची वीज बिले ही अनैतिक असून त्यानुसार शेतकरी कुठल्याही प्रकारचे शेतीपंपाचे बिल भरण्यास बांधील नाही.वरील सर्व बाबींचा विचार करून खंडित केलेला वीजपुरवठा तातडीने सुरळीत करून इथून पुढे कोठेही विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषाचा भडका उडून अनुचित प्रकार घडू शकतात व होणाऱ्या परिणामाची जबाबदारी वीज वितरण कंपनीची जळगाव.

    असे निवेदन आज विज महावितरण सहाय्यक अभियंता यांना देण्यात आले निवेदन देतेवेळी प्रहर शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन प्रहार जनशक्ती पक्षाचे अमोल फरताळे काँग्रेसचे ॲड. समीर देशमुख ,सचिन पवार, शंकर गायके, वसंत झांबरे, किरण चर्मळ, सुनील पाचपुते ,बापूसाहेब शेलार, अरुण मुरकुटे ,सतीश ठाकरे ,रामभाऊ नाईकवाडे मेहबूब शेख ,सागर गायकवाड, प्रितम पटणी शहराध्यक्ष, बाळासाहेब मांजरे, सुरेश गोंधळी,नानासाहेब शिंदे,अण्णासाहेब पवार, रंगनाथ भोरकडे, वसंत वाघ, सुकदेव मढवई, विलास नागरे.इत्यादी शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.

   आज आम्ही शेतकरी, काँग्रेस व प्रहार चे सर्व पदाधिकारी महावितरण आचे पाटील यांच्याशी चर्चा केली असता आमचे म्हणणे पूर्णपणे समजून न घेता आम्हाला तेथून फक्त समजूत घालून निवेदन घेऊन परत पाठविले आहे आम्ही चर्चा करत असताना त्यांनी कुठलेही ठोस आश्वासन न देता टोलवाटोलवी केली.जर आमच्या निवेदनाचा व्यवस्थित मार्ग काढला नाही तर  येत्या आठ दिवसात आम्ही परिसरातील सर्व शेतकरी बांधवासमवेत त्या-त्या गावातील महावितरण सबडीविजन ला ताब्यात घेऊन आंदोलन करणार आहोत अमोल फरताळे तालुकाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष.