नाटेगाव प्रतिनिधी
कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथे स्वराज्य- इतिहासाच्या पाऊलखुणा परिवार आणि छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापुर यांच्या महिला विभागाच्या संयुक्त विद्यमाने नाटेगाव येथे आयोजित हळदी कंकु कार्यक्रमात शिवव्याख्याते दिपकराजे देशमुख यांच्या शिवव्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने हळदिकुंकू कार्यक्रम साजरा करून शिवविचारांचे वान एकमेकींना दिले.
यावेळी महिला भगिनी म्हणजे सुप्तगुणाचा खजिना असतो.कितीही मोठी सत्ता असु द्या ठरवल तर ती उलथवून टाकण्याची ताकद भगिणीमध्ये असते हे जिजाऊ मॉसाहेबाचे अन झाशीच्या राणीचे उदाहरण स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे संस्थापक कैलास दुघड यांनी देत आपले विचार मांडले.तर शिवव्याख्याते प्रा.दिपकराजे देशमुख यांनी उपस्थित शिवबंधु भगिनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, माता भगिणीनी एकमेकींना शिव विचाराचे वाण द्यावे.रक्षाबंधनाला आणि भाऊबीजेला आपल्या भावाकडून जसा तो तुमचा आदर करतो तसाच इतर माता भगिणीचा त्यांन कराव याचे वचन घ्यावे.जग तुम्ही मुलांसाठी काय कमवल हे नाही; तर मुलांना कसे संस्कार देऊन वाढवल हे बघत.जेव्हा माता भगिनी आपल्या मुलांना जिजाऊ मॉसाहेबा सारखे संस्कार देतील तेव्हाच घराघरात शिवराय जन्माला येतील.तरुणांनी शिवराय सारखी दाढी वाढवून किंवा भाळी चंद्रकोर लावुन फिरण्यापेक्षा शिवरायांचे विचार अंगी बाळगावे. प्रत्येक तरुण-तरुणीने विठ्ठल रुखमाईच्या रुपात आपल्या आई वडीलांना पाहावे. कवियत्री मीनाताई शिंदे यांनी १०मार्च रोजी धर्मवीर गड येथे छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती तुळापुर परिवार आयोजित बलिदान स्फूर्तीदिन सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपस्थित बंधुभगिनींना केले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी सुरेखा वर्पे, योगिता मोरे,संगीता मोरे,मंगल वर्पे,ज्योती तिपायले,राजुडे ताई,सुनिता गायकवाड-काळे,विमल मोरे,राजश्री गडाख,रोहिणी मोरे,अनिता मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.या प्रसंगी स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराचे सहसंस्थापक सत्यनारायण दिक्षीत, तसेच सर्व शिलेदार ,छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीचे शिलेदार , शिवभारत सप्ताह समितीचे संदिप बर्शिले,मराठा मावळा संघटनेचे गोरख कोटमे,धर्मयुद्धा संघटनेचे संतोष खकाळे व नवनाथ ढेरेंगे तसेच नाटेगाव येथील ग्रामस्थ व माता भगिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
