Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

२६मार्च भारत बंद यशस्वी करा --भाकप/ आयटक

Responsive Ad Here

गणेश पांढरे प्रतिनिधी जळगाव 

                केंद्र सरकारने  दिल्ली येथील शेतकरी आंदोलन ला 110दिवसाचा कालावधी होऊन सुध्धा याची दखल घेतलेली नाही. तसेच 200 च्या वर शेतकरी शहीद झाले त्यांच्याबद्दल संवेदना देखील व्यक्त केली नाही केंद्र सरकारच्या संवेदनशून्य व्यवहाराच्या निषेध करण्यासाठी तसेच गेल्या वर्षी kovid 19साथ मधील लाकडाऊन कालाचा गैरफायदा उठवून केंद्र सरकारनं कामगार हिताचे अनेक कायदे रद्द करून मनमानी पद्धतीने रद्द करवून चार कामगार सहिता तयार करून देशातील कार्पोरेट घराण्यांच्या बाजूला कायदे वलवलेले आहे त य या केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी व शेतकरी विरोधी धोरण विरुद्ध देशातील कोटी कोटी जनता सरकारच्या विरोधात आहे .

     त्या  कारभाराचा निषेध करण्यासाठी व खालील मागण्यांसाठी 26 मार्च  21 रोजी देशातील शेतकरी संघर्ष समन्वय समिती  व कामगार संघटनांनी देशव्यापी बंदचे आवाहन केलेले आहे. या देशव्यापी बंद मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा शेतमजूर युनियन, ऑल इंडिया ट्रेड युनियन. काँग्रेस सहभागी आहे व खालील मागण्यांच्या संदर्भात केंद्र सरकारने दखल घ्यावी म्हणून देशव्यापी आंदोलन आहे

1) केंद्र सरकारने केलेले तीनही कृषी कायदे  रद्द करावे 2)स्वामिनाथन समितीच्या शिफारशी प्रमाणे शेतकऱ्यांना शेतीमालाचे भाव देण्यात यावेत 3)खते ,बी-बियाणे ,औषधी यांच्या किमती अनुदानित दरात द्याव्यात.

4) डिझेल पेट्रोलचे दर मूळ किंमत वर gst लावून राज्य केंद्र सरकारांचे अवांतर कर रद्द करा व दर कमी करावेत

5) कामगारांचे हिताचे पूर्वीचे कायदे कायम ठेवावे व सरकारने लादलेले चार कामगार सहिता रद्द कराव्यात

6) सर्व क्षेत्रातील असंघटित कामगारांना किमान 21 हजार रुपये वेतन व 60 वर्षावरील सेवानिवृत्तांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावी. 

7)शेतमजुरांसाठी केंद्रीय कायदे करून यात सामाजिक सुरक्षा लागू करा

 8)देशातील दुर्बल घटक व महिलांवरील अत्याचार यांना आळा घाला

9) ग्रामपंचायत कर्मचारी यांना 10 ऑगस्ट 2000 पत्रकाप्रमाणे पगार लागू करा 100% पगाराचे अनुदान द्या

 10)आशा वर्कर यांना ऑक्टोबर20 पासून रखडलेली मानधन वाढ फरक द्या 11)अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण आहार अपडेट करण्यासाठी मराठी ट्रॅकर असावा व रजिस्टरचा पर्याय खुला असावा 12)विज कायदा २०२०रद्द करावा 

13)पूर्वीचा साठेबाजी नियत्रंण कायदा कायम ठेवा

14) बँक विमा एल आय सी विज मंडळ खाजगीकरण  रद्द करा 15)रेल्वे, एअर इंडिया, ongc विक्री बंद करा 

आदी मागण्या आहेत त्यासाठी देशव्यापी भारत बंद २६मार्च२१ रोजी आहे त्या दिवशी जळगाव कलेक्टर कचेरिसमोर सकाळी ११तेदुपारी१. वा केली जाणार आहेत तरी सकाळी ११वा कलेक्टर कचेरीवर सर्व अंगणवाडी  आशा ग्राम कर्मचारी रोजगार सेवक वीज कर्मचारी बँक विमा संरक्षण कर्मचारी संघटना तसेच भाकप शेतमजूर, शेतकरी पदाधिकारी/ कार्य करते बंधू भगिनींनी,

 निदर्शने त सहभागी व्हावे असे आवाहन 

अमृतराव महाजन का अमृत महाजन  शान्ता राम पाटील राजेंद्र झा, छोटू पाटील, प्रेमलता पाटील ,मीनॉक्सी सोनवणे, ममता महाजन   ,वासुदेव कोळी, सुलोचना साबळे प्रतिभा पाटील चंद्रकला चींचोरे मीना कटोले गोरख वानखेडे, निर्मला शिंदे, काळू कोळी जे डी ठाकरे, का शेख जे एन बाविस्कर वीरेंद्र पाटील पि वाय पाटील सत्तार तडवी मुरलीधर जाधव   .