जिल्हा प्रतिनिधी रावेर उमेश कोळी
तीन राज्यांमधील अतिशय महत्वाच्या शहरांना जोडणार्या अंकलेश्वर ते बर्हाणपूर या राज्यमार्गाला आता नॅशनल हायवेचा दर्जा मिळाला असून याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी केलेला पाठपुरावा निर्णायक ठरला आहे.
गुजरात, महाराष्ट्र व मध्यप्रदेशातील शेती संपन्न ग्रामीण भागातून जाणारा Ankleshvar to Barhanpur अंकलेश्वर – बुर्हानपूर राज्यमार्गाचे अखेर राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झालाचे रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्रालयाने राजपत्राद्वारे जाहीर केले. या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर होण्यासाठी रावेर लोकसभा क्षेत्राच्या खासदार रक्षाताई खडसे ह्या मागील ७ वर्षापासून वेळोवेळी पाठपुरावा करून प्रयत्न करीत होत्या. अखेर पाठपुराव्यास यश आल्याने खासदार रक्षाताई खडसेंनी आनंद व्यक्त करून पंतप्रधान नरेंद्र मोदी व रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील तळोदा – शहादा – शिरपूर – चोपडा – यावल ते रावेर या मार्गाने बुर्हानपूर अशा एकूण २४० किमी राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे. तसेच लवकरात लवकर खासदार रक्षाताई खडसे या रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना भेटून सदर महामार्गाचे काम मार्गी लागण्यासंदर्भात मागणी करणार असल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांच्या कार्यालयाने दिली आहे.
