गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल
पत्रकार राजधर (आबा) महाजन यांना दिली चुकीची माहिती-2017 चे प्रकरण-राज्य माहिती आयोगाचा निर्णय
एरंडोल (प्रतिनिधी) - येथील बहुचर्चित नगरपालिका सध्या दीड लाखाच्या लाचप्रकरणी जिल्ह्यासह राज्यात चर्चेत आहे. कार्यालय अधिक्षक ढमाळ सध्या न्यायालयीन कोठडीत असून एरंडोल नपाचे तत्कालिन कार्यालय अधिक्षक मिसर यांनी चुकीची, अयोग्य, दिशाभूल करणारी माहिती पुरविल्याबद्दल राज्य माहिती आयोगाने मिसर यांना 2500 रू. (दोन हजार पाचशे) दंड ठोठावला असून मुख्याधिकारींना दंड वसुलीचे आदेश दि. 19 मार्च 2021 रोजी दिले असल्याने शहर, परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
![]() |
| file photo |
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एरंडोल येथील पत्रकार आबा संतोष महाजन (रा. माळीवाडा, एरंडोल) यांनी एरंडोल नपाकडे दि. 7/9/2017 रोजी माहिती अर्ज दिला परंतू तत्कालिन कार्यालय अधिक्षक तथा जनमाहिती अधिकारी एस. जी. मिसर यांनी चुकीची मोघम माहिती पुरविली. आबा महाजन यांचे समाधान न झाल्याने त्यांनी अपिल दाखल केले. त्यानुसार राज्य माहिती आयोग खंडपीठ नाशिक यांनी दि. 9/2/2021 रोजी खुलासा सादर करण्याचे नपास आदेश दिले. परंतू खुलासा आला नाही. याचा अर्थ काहीही म्हणणे नाही असे गुगल मीटद्वारे ऑनलाईन सुनावणीसाठी मिसर उपस्थित राहून लेखी खुलासा दिला नाही.
आयोगाने आदेश दिला की, तत्कालिन कार्यालय अधिक्षक एरंडोल नपा एस. जी. मिसर यांना आयोगाच्या नियमानुसार 2500/- (दोन हजार पाचशे मात्र) दंड करण्यात आला असून मुख्याधिकारींना वसुलीचे आदेश दिले आहेत. सदर बाबत जिल्हाधिकारी जळगांव यांना देखील कळविण्यात आले आहे. यापूर्वी देखील एरंडोल नपा तत्कालिन माहिती अधिकारीस दोनदा दंड झालेला आहे. माहिती अधिकारानुसार नागरीकास माहिती मिळावी अशी अपेक्षा असतांना एरंडोल नपा मात्र दशाभूल करते यास म्हणावे तरी काय?
