Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

योगा थेरपीअभ्यासक्रमांतर्गत जागतिक महिला दिन संपन्न

Responsive Ad Here

अमरावती प्रतिनिधी

                     वैश्विक महामारी काळात रोग प्रतिरोधक क्षमता वाढविण्यास महिलांसाठी वरदान 

               संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आजीवन अध्ययन व विस्तार विभागातील पदव्युत्तर पदविका योग थेरपी अभ्यासक्रमाच्या वतीने 8 मार्च जागतिक महिला दिन ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष विभागाचे संचालक मा. डॉ.श्रीकांत पाटील तसेच प्रमुख अतिथी व्याख्यात्या प्राध्यापक मंजुषा गोपाल उताणे शब्दप्रभू भाषण प्रशिक्षण केंद्र अमरावती यांची उपस्थिती होती. विषय समन्वयक प्राध्यापक शुभांगी रवाळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .महिला दिनी शुभेच्छा देऊन गाडगेबाबांच्या गीतांनी कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेखा तसेच प्रास्ताविक विषय समन्वयक प्रा. शुभांगी रवाळे यांनी केल. तसेच करोना वैश्विक महामारी संकट काळात प्रत्येक कुटुंबाला लॉक डाऊन असल्याने घरातच राहावे लागत होते या काळात विशेषतः महिलांच्या मानसिकतेवर परिणाम झाल्याचे आढळून आले. त्याकरिता महिलांनी योगसाधनातुन  स्वतःचे आरोग्य व मानसिक स्वास्थ्य जपता आल. काही महत्वाची आसने व श्वसन संस्थांचे व्यायाम आणि प्राणायाम यावर विशेष मार्गदर्शन केले. तसेच प्रा. मंजुषा  उताने यांनीसुद्धा काळाच्या गरजेनुसार योग साधनेचे महत्त्व देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा कळून चुकले असे मत व्यक्त केले मानसिक स्वास्थ्य बिघडले की शरीरस्वास्थ्य कमकुवत होते आणि मनोधैर्य खचून आपली रोग प्रतिरोधक क्षमता कमी होऊ लागते संसर्गजन्य विषाणू हा सर्वासाठीच घातक आहे मनाचे आरोग्य हे आपल्या मेंदूवर

                अवलंबून आहे आपली मानसिकता ही नेहमी सकारात्मक असायला पाहिजे आपले आचार-विचार हे सुद्धा सात्विक अहंकार, ईर्षा, राग द्वेष यासारखे घात करणारे शस्त्र काळाच्या गरजेनुसार दूर करायला पाहिजे कारण मानसिकतेवर घात करणारे शस्त्र मनोबल खर्चून टाकल्याने मनुष्य कमकुवत होतो.त्यामुळे त्याला नैराश्य येऊन जीवन जगणेकठीण वाटायला लागते  निरोगी स्वास्थ्यासाठी आनंदी जीवन जगणे हे आपल्याच हातात असते .कुमारी वैशाली गाडे विद्यार्थिनी हिने सुद्धा मनोगतातून सुचविले की कुटुंबाचे आरोग्य सुदृढ ठेवणे हे महिलांवरच अवलंबून असते कारण महिला ही कुटुंबावर संस्कार देणारी क्षणिक पत्नी असून अनंत काळाची माता असते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ.श्रीकांत पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून जागतिक महिला दिनी सर्वांना शुभेच्छा दिल्या . कार्यक्रमाचे संचालन प्रा अश्विनी राऊत यांनी केले , आभार प्रदर्शन प्रा स्वप्निल मोरे आणि ऑनलाईन कार्यक्रमाची धुरा प्रा स्वप्निल ईखार यांनी सांभाळली.विद्यार्थ्यांनच्या सहभागाने कार्यक्रम यशस्वी पणे पार पडला.