Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वादळी वाऱ्यामुळे पिकाचे नुकसान

Responsive Ad Here

 राजेंद्र डोईफोडे प्रतिनिधी  देऊळगाव

                   जिल्ह्यात पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. गुरुवारी जिल्ह्यातील काही भागांत पाऊस झाला होता. तसेच शुक्रवारी बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वातावरणात बदल झाला. मेघगर्जनेसह वादळासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. डोईफोडे वाडी येथे पिकाचे नुकसान वादळी वाऱ्यासह पाणी गारा यांच्यामुळे पिकांचे नुकसान पांगरी डोईफोडे वाडी येथे दिनांक 19 ला संध्याकाळी विजांचा कडकडाट गारा व पाणी यांच्यामुळे गहू हरभरा बाजरी मका या पिकांची हानी झाली. कांदा, गहू आणि गुरांच्या चाऱ्यासाठी पेरलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

     आंब्याचा बहर पाण्यामुळे नुकसान झाले एकीकडे कोरोन महामारी तर दुसरीकडे वादळी वारा यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत असून शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी असे शेतकरी वर्गाची मागणी आहेत.काही गावांमध्ये गारपीटही झाली. या पावसामुळे कांदा बीजोत्पादनाचे सर्वाधिक नुकसान झाले. तसेच सोंगणीस आलेल्या गव्हाचेही नुकसान झाले.  खरीप हंगामातही सोंगणीला आलेल्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तसेच सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील गहू सोंगणीला असतानाच गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून मदत देण्याची मागणी होत आहे.