Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोलला रस्ते कामांमुळे वाढते अपघात , नैराश्येमुळे आत्महत्या वाढली - चिंता वाढली एरंडोल - म्सावद शहरी रस्ता संथगती धूळ , खडीमुळे मोठ्या अपघातांची वाट पाहताय का ?

Responsive Ad Here

 गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी

         एरंडोल शहरात रेंगाळलेल्या हायवेच्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले तर नैराश्यामुळे आत्महत्या वाढल्यामुळे चिंता वाढली आहे . बेफिकीर वृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे की ठेकेदारांच्या आडमुठेपणा , अपघातांना कारणीभूत कोण ? असा संतप्त सवाल नागरीकांनी केला आहे तर एरंडोल - म्हसावद शहरी रस्त्याच्या संथगतीमुळे धुळ आणि विखूरलेल्या खडीमुळे नागरीक हैराण झाले आहेत . दोन महिन्यांपासून सरस्वती कॉलनीपासून तहसिल कार्यालयापर्यंतच्या दोन्ही बाजूकडील रस्ता खोदून ठेवल्याने मोठ्या अपघाताची वाट पाहताय काय ? असाही सवाल केला जात आहे . चार दिवसांपूर्वी महामार्गावर शिक्षिकेसह मुलाचा हॉटेल फाऊंटेनजवळ ट्रकने चिरडल्याने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली . सदरप्रसंगी हायवेवर विखुरलेल्या खडीमुळे शिक्षिकेची अॅक्टीव्हा घसरून ट्रकच्या मागील चाकात आई - मुलगा दबला गेल्याने जागीच मृत झाले . यास बेफिकीर , बेजबाबदार अधिकारी , ठेकेदारांविरूध्द सदोष वधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी नागरीक , महिलांनी केली आहे . 

         विशेष दुःखाची बाब म्हणजे नैराश्यामुळे एरंडोलमधील रिक्षा चालक किरण पाटील आणि पंचायत समिती वसाहतीमधील युवती रोहिणी चंदनकर यांच्या आत्महत्येमुळे हळहळ व्यक्त केली जात असतांनाच काल पद्मालय परिसरात बोरगांवच्या कृष्णा चव्हाण वायरमनने झाडाला दोर बांधून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण वाढलेआहे .

     एरंडोल शहरातील म्हसावद रस्ता काम दोन वर्षांपासून रेंगाळले असून अनेक किरकोळ अपघात झाले आहेत . सुमारे तीन महिन्यांपासून काम थांबल्याने वाहनधारकांसह नागरीक वैतागले आहेत . मोठा अपघात टाळ्यासाठी निदान आमदार , प्रांत , तहसीलदार,पोलिसांनी तरी दखल घ्यावी अशी अपेक्षा नागरीकांनी केली आहे .