पहूर , ता . जामनेर दि . ३१( शंकर भामेरे ) : - पहूर येथी ग्रुप
जळगाव प्रतिनिधी
पहुर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर . टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सी .टी . पाटील सर आणि ज्येष्ठ विज्ञान शिक्षक ए .पी . पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आज निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले .
आर .टी . लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आज बुधवारी सकाळी नऊ वाजता शासकीय नियमांचे पालन करून निरोप समारंभाच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते .यावेळी सत्कार मूर्ती मुख्याध्यापक सी .टी . पाटील सर व सत्कारमूर्ती विज्ञान शिक्षक ए. पी . पाटील सर यांनी संस्था , शाळा ,सहकारी, आणि गावाप्रती आपल्या कृतज्ञता भावना व्यक्त केल्या . शाळेचा निरोप घेताना त्यांना गहिवरून आले . १३ जून १९८८ रोजी सी . टी . पाटील सर क्रीडा शिक्षक म्हणून रूजू झाले . त्यानंतर ते मुख्याध्यापकपदी विराजमान झाल्यानंतर शालेय प्रशासनात एक वेगळा ठसा त्यांनी उमटवला . शिस्त आणि कार्यतत्परता या गुणांमुळे त्यांनी विद्यार्थी वर्गात एक स्वतःची ओळख निर्माण केली होती .३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज ते सेवानिवृत्त झालेले आहेत .
ज्येष्ठ विज्ञान शिक्षक ए .पी . पाटील सर हे १४ जून १९८९रोजी पहूर गृप एज्युकेशन सोसायटी संचलित आर .टी . लेले हायस्कूल परिवारामध्ये रुजू झाले . विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते परिचित होते . विद्यार्थ्यांना दैवत मानत त्यांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले . विज्ञानासारखा विषय अतिशय सोप्या पद्धतीने शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता .विविध क्लुप्त्या आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा उपयोग करून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले .गेल्यावर्षी ते नियतवयोमानानुसार निवृत्त झाले .मात्र कोरोना विषाणू संक्रमणाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे आज झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला . पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी , आर . टी .लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय , ग्रामपंचायत पहूर कसबे , विविध कार्यकारी सोसायटी , शहर पत्रकार संघटना , सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय , आर .बी . आर . कन्या माध्यमिक विद्यालय , जय गजानन दूध उत्पादक संस्था आदी विविध संस्था संघटनांतर्फे सत्कारमूर्ती सी . टी . पाटील सर ,सौ .सुनंदा पाटील मॅडम , ए .पी . पाटील सर व सौ . मीना पाटील मॅडम यांचा सत्कार करण्यात आला . तसेच मुख्याध्यापकपदी विराजमान झालेल्या ज्येष्ठ शिक्षक व्ही . जी . भालेराव सर यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे , सत्कारमूर्ती सी . टी . पाटील सर , सत्कारमूर्ती ए .पी . पाटील सर , सेवानिवृत्त मुख्याध्यापक व्ही .के . बडगुजर सर , नवनियुक्त मुख्याध्यापक व्ही .जी . भालेराव सर , पर्यवेक्षक आर .बी. पाटील सर , ज्येष्ठ शिक्षक एस . व्ही . पाटील सर , सेवानिवृत्त शिक्षक के .टी .पाटील सर , युवा नेते किरण पाटील आदींनी मनोगतातून शुभेच्छा व्यक्त केल्या .
याप्रसंगी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख , सचिव डॉ .अनिकेत लेले , संचालक अॅड . संजय पाटील , सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक खांजोडकर , आर .बी. आर. कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन सर , माजी विकासो चेअरमन अरुण घोलप , विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन किरण खैरणार , वरिष्ठ लिपीक किशोर पाटील , माजी सरपंच शंकर जाधव , शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे ,शिवसेनेचे तालुका प्रवक्ता गणेश पांढरे आदींसह सर्व शिक्षक - शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी उपस्थित होते .कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर यावेळी शासकीय नियमांचे पालन करण्यात आले .सूत्रसंचालन व्ही . व्ही .बोरसे सर यांनी केले . जी .एच . भामेरे सर यांनी आभार मानले .
