प्रदीप रघु ते प्रतिनिधी अमरावती
अमरावती जिल्ह्यातील तालुका वरुड ग्रामपंचायत अंतर्गत वाठोडा्. येथील कायम रहिवासी सौ.मदांबाई ज्ञानेश्वर चैवडे. वार्ड क्रमांक 3 मध्ये स्वतःची जागा असल्याने त्यांचा व्यवसाय मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करणे .अशातच त्यांचे घर पाणी पावसाअभावी वादळ वाऱ्याने केव्हा जीवावर कोसळून जाईल याचा काही भरोसा नाही. असे असताना ग्रामपंचायत कार्यालयाकडे घरकुल ची मागणी केली .मागील वर्षी कार्यालयात असलेले पदाधिकारी हे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देत असे त्यांचेकडून सहा हजार रुपये तुमचे घरकुल आले असे सांगून त्यांनी घर टॅक्स भरुण घेतले.आपल्या रक्ताचे पाणी करुन उन्हात हैरान होऊन एक एक पैसा जमा करून ते घर टॅक्स पूर्ण भरून दिले.
घर टॅक्स भरल्या नंतर काही दिवसांनी कायम रहिवाशी असलेले सौ. मंदाबाई ज्ञानेश्वर चैवडे .तसेच यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन चौकशी केली .तेव्हा त्यांना तुमचे घरकुल 2022 नंतर येईल असे सांगण्यात आले.ग्राम पंचायत पदाधिकारी खोटे बोला पण रेटून बोला आणि आमची तिजोरी भरा. पूर्णपणे गरीब नागरिकांकडून वसूल करून घेतो आणि ते घरकुलापासुन त्यांना वंचित ठेवतो. तेव्हा वाठोडा येथील घरकुल च्या प्रतीक्षेत असलेल्या मंदाबाई यांना घरकुल देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे .जेणेकरून त्यांचे जीवन जगणे सुकर व्हावे.
