प्रतिनिधी जळगाव
महाराष्ट्रात संत श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाजाचे दैवत आहे संपूर्ण भारतात संताजी जगनाडे महाराज यांच्यावर श्रद्धा ठेवून समाज मार्गक्रमण करीत आहे. त्याचप्रमाणे राजस्थान ,मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, बिहार व उत्तर भारतात तेली समाजाचे आराध्य म्हणून तेली समाज मा कर्मा बाईंना पुजत आहे . त्यांची महती जशीजशी समाजात प्रसिद्ध होत आहे .त्यानुसार संपूर्ण भारतात तेली समाज मा कर्मा बाईंना पुजत आहे .आज सात एप्रिल मा कर्मा देवीचा तिथीनुसार अवतरण दिवस आहे .त्यानिमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. विनम्र वंदन करून त्यांच्या संबंधी प्रचलित कथा संकलन करून त्रोटक स्वरूपात सादर करीत आहे. राजस्थान मधील नागोर जिल्ह्यातील गाव कालवा तहसील मकराना येथील एका शेतकरी व धार्मिक कुटुंबात जन्म झाला .वडिलांचे नाव जीवना राम डूडी व आईचे नाव रतनी देवी .दोन्ही माता पिता कृष्ण भक्त होते. वडिलांचा व्यवसाय तेल घाणा चा व शेतीचा. बालवयातच मा कर्मा देवी विवाह झाला .परंतु अल्पकाळात पतीचे निधन झाले आणि संपूर्ण आयुष्य विधवा म्हणून त्या जगल्या .आयुष्यभर कृष्णभक्तीत लिन राहिल्या. या काळात जन्मापासून अनेक लीलांचे प्रसंग लोक कथन करतात .मा कर्मा बाईच्या जन्मावेळी फार मोठ्या प्रमाणात गावात वर्षा झाली .जन्मताच बालके रडतात परंतु मा कर्मा बाई हसत होती. प्रसूतीनंतर हा प्रसंग दाईने गावात सांगितला आणि सांगितले की ही बालिका दैवी अवतार आहे .लहान वयात आई वडिलांचे संस्कार मा कर्मा देवी हळूहळू स्वीकारत होती .
रोज पिता नित्यनेमाने कृष्णमूर्ती ला भोग चढवित असे ,त्याशिवाय ते अन्नग्रहण करीत नसत. एकदा मा कर्मा देवी चे माता पिता तीर्थयात्रेला निघाले व मा कर्मा देवी ला कृष्णमूर्ती ला भोग रोज लावण्याचे सांगून निघाले. इकडे मा कर्मा देवी वडिलांच्या सांगितल्याप्रमाणे रोज खिचडी बनवून त्यावर ghee व गूळ टाकून भोग लावण्याचे सुरू केले पहिल्या दिवशी भोग लावला. ठाकुर जी ला भोग स्वीकारण्याचे सांगितले .परंतु ठाकुर जी ने भोग स्वीकारला नाही .तेव्हा मा कर्मा देवीने ठाकूरजिला सांगितले की तुम्ही भोग स्वीकारल्याशिवाय मी भोजन घेणार नाही .असे सांगून स्वतःच्या घागरा चा पडदा लावून , भोग स्वीकारण्यास सांगितले. थोड्यावेळात ठाकुर जी ने भोग स्वीकारल्याचे पाहिले. त्यानंतर मात्र खिचडा बनवणे त्यावर ghee गुळ टाकने व भोग लावणे आणि त्यानंतर भोजन करणे असे अनेक दिवस चालले .
तीर्थ यात्रा संपल्यानंतर आई वडील घरी आले. त्यांनी घरातील घी व गुळ संपल्याचे पाहिले व मा कर्मा देवीला याविषयी विचारणा केली असता हे सर्व ठाकुर जी ने भोग मध्ये स्वीकारल्यामुळे संपल्याचे सांगितले. ही आश्चर्यजनक घटना आई-वडिलांच्या पदरी पडली नाही. तेव्हा हे सत्य असल्याचे मा कर्मा देवीने प्रत्यक्ष अनुभव करून दाखविला. तेव्हापासून मा कर्मा देवी ला गाव आणि परिसरात जनता भजु लागले. लहानपणापासून कृष्णा बद्दल प्रेम व आपुलकी वात्सल्य मा कर्मा देवीच्या मनात होते. मध्यप्रदेशातील शिवपुरी भागात राहत असताना मा कर्मा देवी ला लोक खूप मान देत असत तिचा हा नावलौकिक पाहून त्या भागातील त्यावेळचा राजा डोला हा मा कर्मा बाईचा द्वेष करीत असत. मा कर्मा बाई ला व तिच्या समाजाच्या लोकांना त्रास देण्याच्या उद्देशाने व आपला राज्यातून बाहेर काढण्याच्या इराद्याने राजाने दृष्ट प्लॅन आखला .राजा ने जाहीर केले की माझा हत्तीला खुजली हा रोग झाला आहे तो बरा करण्यासाठी तेलाने भरलेल्या तलावात त्याला अंघोळ घातल्यास त्याचा आजार बरा होईल. तेव्हा माझ्या राज्यातील समस्त तेली लोकांनी तेल काढून तलाव तेलाने भरून द्यावा .तसे न केल्यास समस्त तेली जातीला माझ्या राज्या बाहेर काढून देण्यात येईल. तेल काढणाऱ्या समस्त तेली समाजासाठी अत्यंत कठीण आणि अशक्य अशी गोष्ट होती. तेली समाजाच्या जीवन मरणाचा प्रश्न होता .ही गोष्ट मा कर्मा देवी ला कळताच मा कर्मा देवी ने कृष्ण भक्तीने कृष्णाला विनंती केली . या संकटातून बाहेर काढण्यासाठी अशक्य ते शक्य झाले आणि तलाव तेलाने भरला. हे राजाला कळल्यानंतर राजा मा कर्मा देवी जवळ शरण आला. माफी मागितली तेव्हापासून समस्त तेली समाज मा कर्मा देवी ला आराध्या मानू लागला .पूजा करू लागला.
मा कर्मा देवी ची कृष्णा प्रति असलेले प्रेम वात्सल्य मनोभावे होते. कृष्ण लहान मुलाच्या रूपात मा कर्मा देवी जवळ येऊन तिच्या हस्ते खिचडी खात असे .मा कर्मा देवी जगन्नाथ पुरी ला असताना जगन्नाथ मंदिरातील हा जगन्नाथ लहान बालक बनवून मा कर्मा बाईकडे भोजनासाठी येत असे. मा कर्मा बाई सकाळी लवकर उठून सर्वप्रथम ठाकूरजी साठे खिचडी बनवीत असे .खिचडी बनवताना तिच्या मनात कृष्णाबद्दल च प्रेम व वात्सल्य इतकं ओतप्रोत असे कि तीला स्वतःच्या आंघोळीची सुद्धा काळजी नसे. उठल्याबरोबर प्रथम माझ्या ठाकूरजी साठी खिचडा बनवणे, ठाकूर जिला खाऊ घालने, यातच धन्यता मानत असे .ठाकूरजी मा कर्मा देवी च्या हस्ते रोज खिचडा खात असे .मग कर्मा देवीची ही प्रसिद्धी पाहून दक्षिण भारतातील एक वैष्णव संत मा कर्मा देवी कडे भोजनासाठी गेले. तेव्हा त्यांनी पाहिले की मा कर्मा देवी कोणत्याही प्रकारे कर्मकांड स्नान इत्यादी न करता खिचडा बनवते व ते भगवंताला खाऊ घालते .हे अत्यंत पापकर्म करीत असल्याचे त्यांनी मा कर्मा देवी ला सांगितलं .तेव्हा कर्माबाई दुसऱ्या दिवशी स्नान इत्यादी करत असताना खिचडा बनवण्या ला उशीर झाला. तेव्हा बालकृष्ण यांनी मा कर्माला खिचडा लवकर कर म्हणून सांगितले. खिचडा कर मा, कर मा, कर मा, कर मा अशी वारंवार विनंती करू लागले. घाईघाईत गरम खिचडी खाताना ठाकूरजींच्या मंदिरातील दुपारच्या भोगाची घंटा वाजली. तेव्हा तोंड न पुसता ठाकूरजी मंदिरात जाऊन बसले. ठाकूर जींच्या तोंडाला खिचडी लागलेली आहे.
तेव्हा कुठून तरी ठाकूरजी आपला भोग लागण्याच्या आधी कुणाची तरी खिचडी खाल्लेले आहे हे पुजारी च्या लक्षात आले. त्यांनी ठाकूर यांना विनंती केली की हे तुम्ही कुठून खाऊन आले. तेव्हा त्यांनी सांगितले की मी रोज मा कर्मा देवी कडे खिचडा खाण्या साठी जातो. परंतु आज कर्मकांडाच्या नादात लागून मा कर्मा देवी ला खिचडा बनवण्या ला उशीर झाला. म्हणून घाईगर्दीत तोंडाला खिचडी लागून राहिली. तेव्हा आपण ज्या संताने मा कर्मा देवी ला हे कर्मकांड करायला सांगितले, त्यांना मा कर्मा देवी ची क्षमा मागायला सांगा व मला भोग लावण्याच्या आधी मा कर्मा देवी ची खिचडी येथे भोगासाठी आणा. मा कर्मा देवीची खिचडी आहे असे म्हणून भोग द्या. तेव्हापासून ही प्रथा जगन्नाथ जगन्नाथ पुरी च्या मंदिरात चालू आहे.मा कर्मा देवी चे नाव कर्मा देवी नव्हते परंतु भगवंताने खिचडी बनवण्यासाठी मा कर्मा देवी ला वारंवार कर मा, कर मा कर मा असे बोलल्याने नाव मा कर्मा पडले.
मा कर्मा देवीच्या अनेक कथा आहेत. काही मोजकेच प्रसंग लोक कथेतून पुढे आले. ते त्रोटक पद्धतीने सांगितले. परंतु या सर्व गोष्टीत मा कर्माबाई ने कर्मकांडाला कुठेही स्थान दिले नाही. परंतु प्रेम वात्सल्य मनोभावे असल्यास भगवंताची कृपा होते. असे या ठिकाणी नमूद केले पाहिजे. साधारणपणे चारशे वर्षांपूर्वी मा कर्मा देवी चे अवतरण झाले .तिथीप्रमाणे सात एप्रिल त्यांचा अवतरण दिवस. त्यानिमित्ताने त्यांना कोटी कोटी वंदन जय मा कर्मा देवी. जय संताजी.
लेखक --श्री के डी चौधरी सर अध्यक्ष ,जळगाव जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा
