पहूर प्रतिनिधी
पहूर येथे भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ६ एप्रिल १९८० रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली होती. त्यानिमित्त भाजपाचा ४१ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. कार्यकर्त्यांच्या घरोघरी जाऊन पक्षाचे ध्वज लावण्यात आले.यावेळी विजय पदम मोरे यांच्या निवासस्थानी मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला.
सुरुवातीला भाजपा कार्यकर्ते विजय मोरे व दिनेश हंसकर यांच्याहस्ते पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी जि प सदस्य राजधर पांढरे , माजी तालूका सरचिटणीस समाधान पाटील , माजी शहर अध्यक्ष शरद बेलपत्रे ,गोकुळ कुमावत ,ज्ञानेश्वर पवार ,भारत पाटील ,आशोक पांढरे ,अक्षय पाटील आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. घरावर भाजपाचा ध्वज लावण्यात आला.गावात प्रत्येक भाजपा कार्यकर्त्यांच्या घरावर भारतीय जनता पक्षाचे ध्वज लावून स्थापना दिवस साजरा करण्यात आला. ग्रा प सदस्या कविता देशमुख , ईश्वर देशमुख ,सलीम शेख ,ग्रा प सदस्य गयास तडवी ,मुन्ना पठाण , शांताराम गोंधनखेडे , दिलीप भोई यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपाचे ध्वज लावण्यात आले.
