पहूर प्रतिनिधी
सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा शिवसेनेचे प्रवक्ते गणेश पांढरे यांचा पुढाकार
जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून त्यांच्या सोबत येणाऱ्या नातेवाईकांचीही संख्या वाढत आहे . त्यातच सध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने रुग्णालयाच्या आवारात मंडप नसल्याने किंवा सावलीसाठी सोय नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकांच्या जीवाची लाहीलाही होत असून यासोबतच त्यांना पिण्याच्या थंड पाण्यासाठी सुद्धा भटकंती करावी लागत आहे या पार्श्वभूमीवर सामाजिक भान जपत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल लोढा तसेच शिवसेनेचे तालुका प्रवक्ते गणेश पांढरे यांच्या पुढाकाराने पहुर येथील ग्रामीण रुग्णालयात मंडप उभारण्याचातसेच दाखल होणाऱ्या रुग्णांच्यानातेवाईकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे .
पहूर ग्रामीण रुग्णालयात कमलाकार पाटील यांनी पिण्याचे शुद्ध बाटलीबंद पाणी उपलब्ध करून दिले आहे . मात्र रुग्णांच्या नातेवाईकांना मायेची सावली देण्यासाठी समाजसेवी संघटनांसह विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या आवारात मंडप उभारण्याची गरज होती .
कोरोनाचा कहर अद्यापही थांबण्याचे नाव घेत नसून जामनेर , पहूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांचे रुग्णालयात येणे-जाणे वाढले आहे . त्यातच आता उन्हाळा सुरू झाल्याने उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे .दवाखान्याच्या आवारात नातेवाईकांना बसण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने नातेवाईकांच्या जीवाची लाही लाही होत आहे.अशा परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाईकांना मायेची सावली देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल भाऊ लोढा , शिवसेनेचे तालुका प्रवक्ते गणेश भाऊ पांढरे यांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतुक होत आहे .