Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आ. चिमणराव पाटील यांच्या कडून ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे उभारले निवासी कक्ष

Responsive Ad Here

   गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल

 एरंडोल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून बहुसंख्य ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल होत आहेत, त्यांच्यासोबत आलेले नातेवाईकांची मात्र जागेअभावी राहण्याची व जेवणाची गैरसोय होत होती, याच बाबींचा गांभीर्याने विचार करून आमदार आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार पारोळा बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा बँकेचे संचालक अमोलदादा पाटील यांनी रुग्णालय आवारात २४तास निवासी कक्ष व भोजन व्यवस्था उपलब्ध करून दिली.

   सदर सुविधेचा लाभ घेतांना उपस्थित नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. यावेळी शिवसेनेचे मा.विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेशअण्णा महाजन, मा. नगराध्यक्ष किशोरभाऊ निंबाळकर, मा. नगराध्यक्ष राजेंद्रआबा चौधरी, मा. नगरसेवक सुनीलभाऊ चौधरी, मा. नगरसेवक नितीनभाऊ बिर्ला,शिवसेना शहरप्रमुख कुणाल महाजन, युवासेना शहरप्रमुख अतुल महाजन, चिंतामण पाटील, राजेंद्र ठाकूर, अमोल भावसार, परेश बिर्ला, अमोल भावसार, कुणाल पाटील, कृष्णा ओतरी, मोहन महाजन, पद्माकर मराठे, तुषार शिंपी, राज पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते