हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीय
क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची १९४ वी जयंती स्थानिक स्वस्तिक ग्रुप,क्रांतिसूर्य दिनदर्शिका व मनिष भुडके मित्र मंडळाच्या वतीने ११०० मास्क वाटप करून साजरी करण्यात आली.सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे ही सर्वात मोठी सुरक्षा आहे.शासन,प्रशासन आणि तज्ञ डॉक्टर सुद्धा मास्कचा नियमित वापर करण्याचे आवाहन करत आहेत.त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून तसेच जनजागृती करून सामाजिक दायित्व निभविण्यासाठी स्वस्तिक ग्रुप,क्रांतिसूर्य दिनदर्शिका व मनिष भुडके मित्रमंडळाच्या वतीने महात्मा जोतिबा फुले जयंतीचे औचित्य साधून ११०० मास्कचे वाटप केले.यावेळी हिवरखेड ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, वीज वितरण केंद्र, भाजी मार्केट तसेच सर्वसामान्य नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.
स्वस्तिक कॉलनी येथे महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मास्क वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी मनिष भुडके, गणेश भोपळे,धनंजय बोदडे, राहुल गिऱ्हे,गणेश निंबाळकर, सुधाकरराव भोपळे, प्रज्वल चिंचोळकर,प्रथमेश भुडके,डॉक्टर खंडारे, सुनिल गिऱ्हे,सुरेश काईगे,अक्षय मोरखडे,रमेश भारसकळे, इ.मान्यवरांची उपस्थिती होती. त्यांच्या या उपक्रमाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.
प्रतिक्रिया मनीष भुडके
आम्ही दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात महात्मा फुले जयंती साजरी करत असतो तसेच समाज प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करत असतो.पण मागच्या वर्षी पासून कोरोनामुळे कार्यक्रमांचे आयोजन शक्य झाले नाही. म्हणून यावर्षी आम्ही सध्याच्या संकटाच्या घडीत शासनाला सहकार्य म्हणून व सामाजिक जबाबदारी म्हणून मास्क वाटपाचा कार्यक्रम ठेवला.
