गणेश महाजन प्रतिनिधी एरंडोल
एरंडोल :महात्मा फुले हायस्कूल एरंडोल येथे दिवंगत संचालक माजी आमदार कै.हरिभाऊ महाजन,सामाजिक कार्यकर्ते व संचालक कै.मधुकर रोकडे,संचालक कै. सुरेश गिरधर महाजन यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे अल्पशा आजराने निधन झाले त्यांच्या सामाजिक,राजकीय कार्याला मान्यवरांनी उजाळा दिला.कोरोना काळात अनेक परिवारातील कर्त्या पुरुषांचा बळी गेला त्यात संत सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळ जळगाव चे संचालक कै.मधुकर रोकडे यांचे दु:खद निधन झाले व एक दानशूर व्यक्तिमत्वाने जगाचा निरोप घेतला त्या नंत
तीन दिवसांच्या अंतराने धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व संचालक कै.सुरेश गिरधर महाजन यांचा सुध्दा करोनाने बळी घेतला.महात्मा फुले हायस्कूल चे कर्मचारी रमेश मोरे यांच्या धर्मपत्नी कै.सिंधुबाई रमेश मोरे यांचा ही करोनाने बळी घेतला. त्यांच्या अचानक जाण्यामुळे धरणगाव शहरात व सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळा मध्ये सामाजिक, राजकीय पोकळी निर्माण झाली आहे अशा भावना या वेळी मान्यवरांनी व्यक्त केल्या.या वेळी सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.विजय महाजन,संचालक शरद माळी,चेअरमन अरूण कुमार माळी,एस.पी. माळी सर यांनी दिवंगत माजी आमदार कै.हरिभाऊ महाजन,कै.मधुकर रोकडे,कै.सुरेश गिरधर महाजन यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली सदर श्रध्दांजली पर कार्यक्रमास संस्थेचे संचालक सुकलाल महाजन,रमेश महाजन,मनोहर महाजन,राजेंद्र महाजन,सुदर्शन महाजन व सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्रध्दाजली पर कार्यक्रमा च्या शेवटी दिवंगत संचालकांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
