Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रक्तदानाने भाजपाचा स्थापना दिवस साजरा -आ. सौ श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वात

Responsive Ad Here

देवानंद नेमाने तालुका प्रतिनिधी

    चिखली जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेतृत्व करणाऱ्या तथा पक्षासाठी आतापर्यंत कोट्यवधी नागरिकांनी बलिदान देऊन त्याग , समर्पण आणि सेवा करून मोठ्या केलेल्या भारतीय जनता पक्षाचा आज 41 वा स्थापना दिवस . कट्टर हिंदुत्व पताका देशभर फडकवत ठेवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून कोरोना महामारीच्या थैमानात रक्ताचा तुटवडा असल्याने आ सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला .

           दि 6 एप्रिल 2021 रोजी  " सेवालय "  या आ सौ श्वेताताई महाले यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या यावेळी 27 युवा मोर्च्याच्या पदाधिकारी यांनी रक्तदान केले . या वेळी आ सौ श्वेताताई महाले यांनी स्वतः उपस्थित राहून रक्तदात्यांना प्रोत्साहित केले .   मोठ्या प्रमाणावर रक्तदान करा . आ सौ श्वेताताई महाले पाटील .

   कोरोनामुळे सर्व जग हादरून गेलेले आहे. कोरोना नावाचा राक्षस विदेशातून भारतात आला . मागील वर्षी आटोक्यात असणारा कोरोना आज घराघरात घुसला आहे . त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे . रक्ताच्या अभावामुळे कुणाचाही जीव जाऊ नये याकरिता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून जीवदानाच्या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे आवाहन आ सौ श्वेताताई महाले यांनी यावेळी केले आहे. 

      यावेळी भाजपा शहर अध्यक्ष पंडित दादा देशमुख , जेष्ठ नेते रामदास भाऊ देव्हडे , तालुका अध्यक्ष डॉ कृष्णकुमार सपकाळ , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष संतोष काळे पाटील , शहर अध्यक्ष सुदर्शन खरात , नगरसेवक गोविंद देव्हडे , अ़ँड सदार साहेब नामु गुरुदासानी , शैलेश बाहेती , प्रा वीरेंद्र वानखेडे , पंजाबराव धनवे , अंकुश तायडे ,सिद्धेश्वर ठेंग, सागर पुरोहित , संदीप लोखंडे गजेंद्र म्हस्के पाटील , रितेश पवार , दत्ता इंगळे , दुर्गादास मोरे , गोपाळ शेळके , राजीक शहा , कैलास घाडगे , राणा योगेशसिंह राजपूत , डॉ रवींद्र पवार , आदिनाथ जाधव , संदीप म्हस्के , अनंता सोळंकी , उमेश खंडागळे , शिवराज साप्ते यांची उपस्थिती होती .  

            तर महेश भगवान पुरी,दुर्गादास भगवान मोरे, सुरेश गणपत शिवरकर, अविनाश केशव भाकडे, सूर्जात सुखदेव रावे, सतीश मधुकर डाबेराव,मंगेश भगवान काटकर, मंदार बाहेकर, दिपक नंदकिशोर शेळके, रितेशकुमार हंसराज भोजवाणी,उमेश खंडागळे, परमेश्वर बापूराव काळे, गोपाल दयाराम पलई, दत्ता इंगळे, गोपाल शळके यांनी रक्तदान केले.    सर्व युवा मोर्चाच्या पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी केला .