Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, अखेर श्रीनिवास रेड्डी यांचे निलंबन

Responsive Ad Here

प्रतिनिधी बीड शरद तागड

 अमरावती  : मेळघाटातील वनरक्षक दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी अमरावती येथून बदली करण्यात आलेले अपर मुख्य प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. गुगामल वन्यजीव परिक्षेत्राच्या वनरक्षक दीपाली चव्हाण यांनी गुरुवारी मेळघाटच्या हरिसाल येथे स्वतःच्या पिस्तुलने गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणी उपवन संरक्षक विनोद शिवकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली होती. आता रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

     अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या हरिसाल वनपरिक्षेत्राच्या अधिकारी आरएफओ दीपाली चव्हाण यांनी सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांनी सुसाईड नोट लिहिली होती. त्या नोटमध्ये त्यांनी अपर प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना उद्देशून लिहिली होती. त्यामुळं श्रीनिवास रेड्डी यांचंही निलंबन करावं अशी मागणी होत होती. भाजपनंही रेड्डींच्या निलंबनाची मागणी उचलून धरली होती.