Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

का.प्र.यश इंटरप्राईजेसने दोन कामगारांना शिल्लक कारणावरून कामावरून केल्याने कंपनीत तनाव

Responsive Ad Here

प्रतिनिधी

    खामगाव शहरातील एमआयडीसी भागात विदर्भात नावाजलेली  एस एन जी व यश इंटरप्राईजेस  कंपनी आहे या कंपनीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगार संघटना आहे याच संघटनेचा अध्यक्ष असलेला कामगार श्री प्रदीप निमकार्डे व श्री सचिन मोरखडे या दोघांनाही शिल्लक कारण समोर करून  कंपनीने दिनांक 23 एप्रिल रोजी सकाळी कामावरून कमी केले होते त्यामुळे कंपनीत असलेल्या मनसे कामगार संघटनेच्या सदस्य असलेल्या कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत काम बंद करत कंपनीच्या गेटवरच ठिय्या आंदोलन केले व कंपनी च्ये मालक व मॅनेजमेंट विषयी रोष व्यक्त करत सदर चे आंदोलन केले यावेळी कंपनीमध्ये काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी पोलीस प्रशासनाचा सुद्धा या ठिकाणी बंदोबस्त दिसून आला परंतु सदर घडलेल्या प्रकाराची माहिती कंपनीतील 

     कामगार संघटनेच्या पदाधिकारी असलेल्या कामगारांनी मनसेचे वरिष्ठ नेते तथा शॅडो मंत्री श्री विठ्ठलराव लोखंडकार यांच्या सह मनसेच्या वरीष्ट कामगार संघटनेच्या पदाधिकारी यांना माहिती दिली असता थेट कामगारांची दखल घेत मनसे शॅडो कॅबिनेट मंत्री विठ्ठलराव लोखंडकार यांनी कंपनीचे मालक श्री.बिपिनजी गांधी यांच्याशी फोनवर चर्चा करून कामावरून कमी केलेल्या संघटनेच्या अध्यक्ष व इतर पदाधिकारी असलेल्या कामगारांना  त्वरित कामावर घ्यावे व कामगारांवर अन्याय होऊ नये असी अपेक्षा व्यक्त केली कामगारांच्या मदतीकरिता त्वरित मनसे जिल्हाध्यक्ष यांना फोन करून घटनास्थळावर प्रत्यक्षजाऊन प्रश्न सोडविन्याचे सांगितले.

     यावेळी मनसे जिल्हाध्यक्षश्री  मदन राजे गायकवाड यांनी सुद्धा घटनेचे गांभीर्य ओळखून कामगारांच्या हिताकरिता चिखली वरून खामगाव येथील एमआयडीसी भागातील यश इंटरपाईजेस येथे हजर झाले यावेळी त्यांच्यासोबत वाहतूक सेनेचे जिल्हाध्य श्री शिवा लगर, खामगाव शहराध्यक्ष श्री आनंद गायगोळ ,श्री आकाश पाटील या सर्व हजर झालेल्या पदाधिकाऱ्यांनी कामगारांना सोबत  घेऊन यश  एंटरप्राइजेस च्या मॅनेजमेंट सोबत चर्चा करून त्वरित कामगारांना कामावर घ्या तसेच यानंतर मनसेच्या कामगार संघटनेच्या कामगारांना कोणतीही अडचण यायला नको तसेच कामगारांवर अन्याय खपून घेणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत कंपनी मॅनेजमेंट सोबत चर्चा केली कामगारांची व मॅनेजमेंटची समज-गैरसमज दूर करत चर्चा यशस्वी केली कंपनी मॅनेजमेंट ने कामावरून कमी केलेल्या कामगारांना त्वरित कामावर घेत मोठे पना व मानुसकी दाखवल्याने  कंपनीतील तनाव निवडला .

    तसेच  कामगारांच्या मदतीला त्वरित धावून गेलेल्या मनसे जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, शहर अध्यक्ष आनंद गायगोळ, आकाश पाटील यांच्ये आभार मानत कंपनीतील कामगारांनी जल्लोष व्यक्त केला कामगारांना कामावर घेतल्यानेच कामगारांनी चालवलेल्या ठिय्या आंदोलन सुद्धा त्वरित मागे घेण्यात आले तसेच कंपनीतील कामकाज पूर्ववत सुरू झाल्याने मॅनेजमेंट व कामगारांची चर्चा यशस्वी पणे घडवून आणल्याने कंपनीच्या मॅनेजमेंटने सुद्धा मनसेच्या जिल्हाध्यक्ष मदन राजे गायकवाड वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, सह इतर मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले