Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

रमजान ईद निमित्त राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी व कर्मचान्यांचे माहे मार्च - एप्रील 2021 चे थकीत वेतन विना विलंब करण्याबाबत महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी

Responsive Ad Here

मो असलम परवेज लोणार तालुका प्रतिनिधी

       मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्वाचा सण रमजान ईद दिनांक 13 मे 2021 रोजी येत असल्यामुळे माहे मार्च - एप्रील २०२१ चे वेतन रमजान ईद निमित्त लवकर मिळवून देण्याची अपेक्षा राज्यातील सर्व मुस्लिम अल्पसंख्याक समाजाने शासनाशी केलेली आहे. तसेच अनेक नगर परिषद  महानगर पालिका तसेच खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षकांनी माहे मार्च २०२१ चे वेतन अद्यापही अप्राप्त असल्याचे अनेक तक्रारी संबंधित आधिकारी व कर्मचाऱ्यांनी  प्रस्तुत संघटनेकडे केलेली आहे. त्यानुसार तसे वेतन मागणी निवेदन शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्रीमती वर्षा गायकवाड, शिक्षण आयुक्त म रा पुणे मा.श्री.विशाल सोलंकी (भा प्र से ), शिक्षण संचालक प्राथमिक म रा पुणे मा.श्री. दत्तात्रय जगताप व संबधीत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे राज्य अध्यक्ष श्री एम ए गफ्फार, महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना यांनी केली आहे.                                                                   


                                                                                          शासन परिपत्रक क्रमांक संकीण- 2415(1515) अर्थसंकल्प शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय , मुंबई-32 दिनांक 13.08.2015 तसेच शासन पत्र क्र, वेतन 1219प्र.क्र. 143टीएनटी-3 शालेय शिक्षण व क्रिडा विभाग , मंत्रालय , मुंबई-32 दिनांक 02.08.2019 अन्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्याचे १ तारखेस अदा करण्या बाबत राज्य शासनाचे स्पष्ट आदेश असतांना दर तीन चार महिन्यात कोणते न कोणते शुल्लक कारण दाखवुन शासनाचे दिलेल्या आदेशा प्रमाणे वेतन वेळेवर होत नाही. वरील संदर्भ १ मधील तरतुदीनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे १ तारखेला करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची कार्यवाही करण्यासंदर्भात मा.शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांना आदेश दिलेले आहे व या प्रकरणी विलंबास जवाबदार असणाऱ्या यंत्रणा, अधिकारी यांचे विरुद्ध कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश देऊन सुद्धा वेतन शासनाच्या आदेशा प्रमाणे वेळेवर होत नाही.

    वरील सर्व बाबींचा विचार करुन कोविड-19 या महामारीच्या काळात मुस्लिम समाजाचा महत्वाचा सण रमजान ईद  येत असल्यामुळे राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी  कर्मचान्यांचे माहे मार्च - एप्रील 2021चे वेतन कोणत्याही परिस्थितीत दिनांक 7 मे 2021 पर्यंत विना विलंब करण्यास राज्यातील सर्व संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी विनंती निवेदनाद्वारे करून याच्या प्रती मा.आ.श्री.विक्रम वसंतराव काळे (शिक्षक आमदार, औरंगाबाद शिक्षक मतदार संघ), मा.आ.श्री.चव्हाण सतीश भानुदासराव ( पदविधर मतदार संघ औरंगाबाद विभाग), मा.आ.श्री.कपिल पाटील (शिक्षक आमदार ,मुंबई शिक्षक मतदार संघ), मा.आ.श्री.सुधीर तांबे (पदविधर मतदार संघ नाशिक विभाग), मा.आ.श्री.अरुण गणपती लाड (पदविधर मतदार संघ पुणे विभाग), मा.आ.श्री.जयंत दिनकर आसगांवकर ( शिक्षक मतदार संघ पुणे विभाग), मा.आ.श्री.अभिजीत वंजारी ( पदविधर मतदार संघ नागपूर विभाग), श्री किरणरावजी सरनाईक (शिक्षक आमदार ,शिक्षक मतदार संघ अमरावती विभाग) या सर्व मान्यवरांना देण्यात आलेले आहे.