संजय पवार प्रतिनिधी अमरावती
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील माहुली चोर ग्रामपंचायत कार्यालयात नागरिकासाठी पहिला टप्पा 28 मे रोजी 63 डोज देण्यात आले व 29 मे रोजी 160 डोज 45 च्या वरच्या वय गटातील नागरिकांना पहिला डोस देण्यात आले व आतापर्यंत गावामध्ये पूर्ण 223 डोज नागरिकांना देण्यात आले व संपूर्ण गाव कोरोना मुक्त करण्याचा ग्रामपंचायत द्वारा धाडसी निर्णय घेण्यात आला या कोरोना सारख्या महा विषाणूला गावातून हद्दपार करण्याच्या हेतूने गावामध्ये लसीकरणाला 28 मे रोजी सुरुवात करण्यात आली त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करीत आहे .
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण सरपंच रामाभाऊ गाडेकर यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले तसेच माऊली चोर उप केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर करुले व आरोग्य विभागाची टीम यांच्यासह ग्रामपंचायत सचिव सुभाष चव्हाण व ग्रामपंचायत उपसरपंच देवेंद्र अमबरते सदस्य शिलाबाई पुनसे विवेक गाडेकर राजू भाऊ सरोदे व पत्रकार देविदास गाडेकर इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले
