Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

चिरोडीतील ग्रामसेवकांच्या कार्यवाहीच्या मागणीसाठी आशा सेविकेने पोलिस अधिक्षक यांना दिले निवेदन।

Responsive Ad Here

   प्रदिप रघुते प्रतिनिधी अमरावती

चिरोडीतील आशा सेविकेला अपमानजक वागणुक व जातीवाचक शिविगाळ प्रकरणी चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनचा गुन्हा नोंदवुन घेण्यास नकार चांदूर रेल्वै तालुक्यातील चिरोडी गावातील आशा सेविका पदावर कार्यरत असणार्या आशा सेविका ज्योती मरसकोल्हे या महिले सोबत अपमानजक वागणुक, शिविगाळ व जिवे मारण्याच्या धमकी देण्याचे प्रकरण दिंनाक 21 मे ला समोल आले.

 पिडिता यांनी चांदूर रेल्वे पोलिस स्टेशन ला तक्रार दाखल  करूनही  पोलिसांनी अपराधी यांच्या विरोधात अध्यापही कोणतीही कार्यवाही केली नाही. कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी आशा महिलेने थेट डाँ. हरिबालाजी पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांना निवेदन दिले व न्याय देण्याची मागणी केली.

       निवेदना नुसार चिरोडी मधिल कार्यरत आशा सेविका श्रिमती ज्योती मरसकोल्है यांच्या सोबत चिरोडी तील ग्रामसेवक श्री.तुळशीराम जाधव , संदिप कुंबरे,ब्रह्मकुमार चव्हाण  यांच्या व्दारे शिविगाळ, अपमानजक वागणुकिचा आरोप आशा महिलेनै लावला आहे. या प्रकरणाची तक्रार आशा महिलेने शूक्रवार 21 तारखेला चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनला दिली , पंरतु पोलिस स्टेशन चांदूर रेल्वे यांनी  गैर अर्जदार  शासकीय कर्मचारी आहे म्हणुन आशा महिलेची तक्रार न घेता परत पाठवले ।

  आता प्रश्न उपस्थित झाला आहै की सरकारी कर्मचारी यांना शासन अपराध करण्याची मोकळीक देत का?  त्यांनी कोणताही गुन्हा केला तरी त्यांच्या साठी वेगळा कायदा आहै का?असे प्रश्न जनतेतुन उपस्थिती केल्या जात आहे.आरोपी विरोधात कार्यवाही न होत असल्यामुळे महिलेने आहत होऊन sp यांना निवेदन दिलै।