प्रदिप रघुते प्रतिनिधी येनस
अमरावती जिल्ह्यातील नांदगांव खंडे अतंर्गत येनस येथे 26मे 021रोजी काळा दिवस भारतीय लोकशाहीसाठी काळा दिवस भाकप , किसान सभा आयटक शाखा येणस च्या वतिने पाळण्यात आला. व तथातग गौतम बुध्द जंयती निमित्य अभिवादन करण्यात आले.आज शेतकरी आंदोलनाला सहा महिने पूर्ण होतात. याच दिवशी म्हणजे २६ मे २०१४ रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्याला सात वर्षे पूर्ण होतात. सरकार त्यांच्याबरोबर इमानदारीने बोलणी करीत नाही, म्हणून शेतकरी आंदोलनाने आज काळा दिवस म्हणून निषेध दिन पाळण्याचे ठरवले आहे. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटना याला पाठिंबा देत आहेत. कारण त्यांचाही नरेंद्र मोदी सरकार बाबत तोच अनुभव आहे. याची उदाहरणे पहा :
* सध्या देशात करोना महामारीची दुसरी लाट सुरू आहे. त्याबाबत या सरकारचा गुन्हेगारी निष्काळजीपणा स्पष्ट झाला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे ऑक्सिजन, लस, व्हेंटिलेटर, हॉस्पिटलमध्ये खाटा या सर्वांचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. सरकारने ती जबाबदारी राज्य सरकारांवर टाकून दिली आहे.
* या सरकारने शेतकऱ्यांनी कधीच न मागितलेले तीन कृषी कायदे जबरदस्तीने त्यांच्या बोकांडी बसवले आहेत. पण त्यांनी मागितलेला किमान आधारभूत किंमतीची हमी देणारा कायदा मात्र करत नाही.
* या सरकारने 4 लेबर कोड जबरदस्तीने कामगारांच्या बोकांडी बसवले आहेत. त्या आधी कामगार संघटना व मालकांच्या संघटना यांच्याशी कधीही वाचारविनिमय केलेला नाही.
* या सरकारने सर्व सार्वजनिक उद्योग भांडवलदारांच्या घशात घालण्याचे धोरण अवलंबिले अवलंबिले आहे. ऑर्डनन्स फॅक्टर्या, रेल्वे, बँका, विमा कंपन्या, तेल कंपन्या, बंदरे, विमानतळ, कोळसा खाणी - काहिही शिल्लक ठेवलेले नाही.
* यांच्या धोरणामुळे असंघटित, स्थलांतरित कामगारांचे जगणे मुश्किल झाले आहे. हाताला कामच नाही, तरीही त्यांना मोफत राशन, जगण्याकरता पैसा याची काहीही व्यवस्था हे सरकार करीत नाही.
* पण दुसर्या बाजूला वीस हजार कोटी रुपये खर्च करून याच करोना काळात नव्या पार्लमेंटची वास्तु आणि पंतप्रधानांसाठी नवे घर दिल्लीमध्ये बांधणे चालू आहे!
* "पीएमकेअर्स" नावाचा अपारदर्शी फंड, राफेल करारात पैसे, अपारदर्शी इलेक्टोरल बॉन्डस्, आर.बी.आय.कडून वारंवार पैसे घेणे, अशा रीतीने पैसा गोळा करणे सुरू आहे. * सी.ए.ए. सारखे उघड-उघड संविधान विरोधी कायदे पास करणे, ट्रिपल तलाक सारखे फूटपाडे कायदे मुद्दाम पास करणे असे चालू आहे.
* जे याचा विरोध करतात त्यांच्याविरुद्ध सी.बी.आय., इ.डी., एन.आय.ए., सुप्रीम कोर्ट, इलेक्शन कमीशन, राज्यपाल अशा संविधानिक आस्थापनांचा सर्रास वापर केला जात आहे.
* पेट्रोल-डिझेल-गॅस ची भाववाढ निरंतर चालू आहे.
* परंतु आजच्या संकटकाळात लागणारा निधी श्रीमंतांकडून विशेष कर लावून गोळा करण्यास सरकार तयार नाही. त्यांचे धोरण उघड उघड मालकधार्जिणे आहे.
थोडक्यात लोकसभेमधले बहुमत वापरून त्यांनी भारतातील लोकशाहीचा गळा दाबून टाकला आहे.
म्हणून या दिवशी देशातील सर्व कष्टकऱ्यांच्या वतीने आम्ही मोदी सरकार सत्तेवर असणे, हा भारतातील लोकशाहीसाठी काळा दिवस आहे म्हणुन भाकप शाखा येणस च्या वतिने निषेध करीत आहोत.
यावेळी आयटक संघटनेचे जिल्हा सहसचिव काँम्रेड प्रफुल देशमुख, अविनाश कणसे , प्रितम गिरडकर, योगेश कणसे , प्रल्हाद चांदुरकर, शूभम चौधरी , पत्रकार व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष येणस प्रदिप रघुते सह कार्येकर्ते व नागरिक निषेद दिनानिमित्य हजर होते.

