प्रतिनिधी पवन चव्हाण
साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या प्रसिद्ध असलेली जिल्ह्यातील प्रसिध्द भेंडवळ घटमांडणीचे भाकीत आज १५ रोजी पहाटे वर्तविले आहे . सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत साडेतीनशे वर्षाची अखंडित ठेवली आहे . यंदा लॉकडाऊनमुळे परंपरा खंडीत होऊ नये म्हणून केवळ चंद्रभान महाराज यांच्या यंशजांसह पाच लोकांनी अक्षय तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली आणि आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण करत या वर्षीचे भाकीत वर्तविले .यंदा राज्यात साधारण पाऊस पडेल . तर पीकही साधारण राहील . देशात नैसर्गिक आपत्ती ओढावेल .
देशाचा राजा कायम राहील देशाची आर्थिक स्थिती याही पेक्षा कमकुवत होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे . तर पावसाबाबत जून महिन्यात पाऊस साधारण पडेल . जुलै महिन्यातील पर्जन्यमान चांगले असेल . तर ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल . सप्टेंबर महिन्यातही पाऊस कमी राहणार आहे . संपूर्ण देश कोरोनाचे संकटात असताना हे संकट आणखी गडद होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली.
यावर्षी चारही महिन्यात पाऊस साधारण असल्याचे भाकीत वर्तविण्यासोबतच अवकाळी पावसाचा प्रभाव या वेळेस कमी असणार आहे .पीक परिस्थिती साधारण राहणार असेल तर ज्यारी , तूर , गहू , कपाशी , सोयाबीन सर्व पिके सर्वसाधारण येतील , पिकांची नासाडी व चाराटंचाई होण्याची शक्यता राहणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.
