Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जनुना तलावावरील वाहनांवर पोलिसांची कारवाई : २४ गाड्या केल्या जप्त

Responsive Ad Here

 प्रतिनिधी पवन चव्हाण

खामगाव:-जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लागला असताना सुद्धा काही नागरिक येथून जवळ असलेल्या जनुना तलाव येथे पोहण्यासाठी व फिरण्यासाठी गेले असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत मिळाली होती . त्या माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपुत यांचे पथक , शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील हुड व कर्मचारी , शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर व कर्मचारी हे आपल्या ताफ्यासह तेथे पोहोचले असता जनुना 


    तलावच्या गेट जवळ त्यांना तिथे २४ गाड्या मिळून आल्या . पोलिसांनी तलाव परिसरात जाऊन पाहणी केली असता त्यांना त्याठिकानी काही लोक तलावात पोहताना मिळून आले . पोलिसांनी त्यांना बाहेर निघायला सांगितले सर्व असता काही लोक आपले कपडे तलावाच्या काठावर सोडून पळून गेले . या ठिकाणी काही नागरिक हे पोलिसांच्या हाती लागले होते . तात्काळ पोलिसांनी तेथे ट्रक व ४०७ वाहन बोलावली व सर्व वाहनांना त्यामध्ये टाकून कारवाईसाठी शहर पोलीस स्टेशन येथे आणले . सोबतच १८ वाहनधारकांना सुद्धा पोलीस स्टेशनमधे आणून बसवले होते . या कारवाई मधे शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा आहेत . पोलिसांनी त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम १८८,२६ ९ , २००,२७१ , ५१ व नुसार कारवाई करण्यात आली आहे .